बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धावत्या रेल्वेतून गरोदर महिला पडली खाली, देवदूतासारखा धावून आला RPF जवान, पाहा व्हिडीओ

मुंबई | मुंबईतील कल्याण रेल्वे स्थानकावर झालेल्या एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये RPF जवानाने एका महिलेचे प्राण वाचवले आहेत. संबंधित महिला ही गरोदर आहे. या घटनेनंतर आरपीएफ जवानाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

चंद्रेश नावाचा प्रवासी आपल्या पत्नीसोबत ट्रेनमधून गोरखपूरला जाणार होता. त्याची पत्नी आठ महिन्यांची गरोदर असून दोघेही चुकीच्या ट्रेनमध्ये चढले. ही बाब चंद्रेशला समजल्यानंतर चंद्रेश आणि त्याची पत्नी ट्रेनमधून खाली उतरु लागले. मात्र त्यावेळी रेल्वे नुकतीच निघाली होती.

रेल्वेतून खाली उतरताना चंद्रेशच्या पत्नीचा तोल गेला आणि ती खाली पडली. यावेळी कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ जवानाने तातडीने धाव घेऊन महिलेचे प्राण वाचवले. यामध्ये कोणालाही कसलीच दुखापत झाली नसून महिला नंतर चंद्रेशसोबत गोरखपूरला रवाना झाली.

दरम्यान, धावत्या रेल्वेमध्ये चढण्याचं धाडस करु नका, अशी सुचना वारंवार रेल्वे प्रशासन देत आहे. धावत्या रेल्वेमध्ये चढण्याचं नको ते धाडस करुन अनेक जण जीवाला मुकतात. त्यामुळे कोणता जरी प्रसंग घडला तरी धावत्या रेल्वेमध्ये चढू नका, असं देखील रेल्वे प्रशासनाने सांगितलं आहे.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

पाहावं ते नवलंच! जॅकलीन फर्नांडीसची हुबेहुब कार्बन काॅपी आहे ‘ही’ अभिनेत्री

देशातील सक्रिय कोरोना रूग्णसंख्येत 227 दिवसातील निच्चांकी नोंद

पुणेकरांना दिवाळीत मिळणार म्हाडाचं गिफ्ट, केली ‘ही’ मोठी घोषणा

“भाजप हा बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या लोकांचा, ध्येयधोरणे नसलेला पक्ष”

क्रेडीट कार्डवर मिळणारे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More