बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“एक पुतिन दिल्लीत बसलेत, ते दररोज आमच्यावर मिसाईल्स सोडतायेत”

नागपूर | गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई करण्यात येत आहे. केंद्र सरकार राजकीय सुडबुद्धीने ही कारवाई करत आहे, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावरील कारवाईनंतर शिवसेनेकडून तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली आहे. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू आहे. त्याची जगभरात चर्चा देखील सुरू आहे. मात्र आमच्यासारखे लोक रोज युद्धाचा अनुभव घेत आहेत. एक पुतीन दिल्लीत बसले आहेत, ते रोज आमच्यावर मिसाईल सोडत आहेत. ईडीच्या माध्यमातून हे मिसाईल्स सोडले जात आहेत. पण तरीही आम्ही डगमगलो नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

सध्या देशातील वातावरण बदलून गेलं आहे. पुन्हा येईन वाले संध्याकाळी इथे येणार आहेत. तेव्हाही मी येईल. बाजूला बसेल, पुढील वर्षी लोकमतच्या कार्यक्रमात येईल, असं संजय राऊत म्हणाले आहेत. आम्ही पंतप्रधान कार्यालय आणि ईडीकडे काही पुरावे दिले आहेत. मात्र, आमच्या पुराव्यांकडे कोणाचही लक्ष्य नाही, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

दरम्यान, केवळ सिलेक्टेड लोकांवरच कारवाई सुरू आहे. काल पाटणकरांवर कारवाई केली गेली. त्या कारवाई मागील सत्य तज्ज्ञमंडळींनी समजून घ्यावं. हे नीट समजून घ्या, चुकीच्या माहितीवर आधारित गोष्टी प्रसारीत केल्या जात आहेत. हळूहळू गोष्टी बाहेर येणार आहेत, असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे. ही बदनामीची मोहीम त्यांच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही, असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष पदाचा राजीनामा!

रेल्वेने घेतला महत्त्वाचा निर्णय; फक्त ‘या’ प्रवाशांना मिळणार सवलत

“काँग्रेसचा उमेदवार भाजपला द्या, आमदार बनवून दाखवतो”

“यांची हाडं राजकीय स्मशानात रचली गेली आहेत, त्यांना आता…”

मोठी बातमी! केंद्र सरकारने कोरोना निर्बंध हटवले, ‘या’ 2 अटी मात्र कायम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More