बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् 25 वर्षीय महिलेनं एकाच वेळी दिला चक्क नऊ बाळांना जन्म

नवी दिल्ली | माली या छोट्या देशातील मोरक्को या शहराजवळ राहणारी 25 वर्षीय महिला सध्या जगभरात चर्चेत आहे. हालीमा सिसी नावाच्या एका महिलेनं एकाच वेळी नऊ बाळांना जन्म दिला आहे. माली देशातील महिलांमध्ये प्रजनन दर खूप जास्त असतो. त्यामुळे आता हालीमाने एकाच वेळी 9 बाळांना जन्म कसा दिला? यासंदर्भातील संशोधन सध्या चालू आहे.

माली सरकारने 25 वर्षीय हालीमा सिसी या महिलेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्या म्हणून पश्चिम आफ्रिकेतील तिच्या मूळ शहरामधून मोरक्कोमधील एका चांगल्या रुग्णालयामध्ये 30 मार्च रोजी दाखल करण्यात आलं होतं. सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये ही महिला सात बाळांना जन्म देईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र नऊ बाळांना एकाच वेळी जन्म दिला आणि त्यामुळे आता ही जगातील एक दुर्मिळ घटना ठरली आहे

मालीच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेनं पाच मुली आणि चार मुलांना जन्म दिला असून सिझेरियन पद्धतीने या महिलेची प्रसुती करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. ही महिला आणि बाळांची प्रकृती ठणठणीत आहे, असं मालीच्या आरोग्यमंत्री असणाऱ्या फॅण्टा सीबे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, काही आठवड्यांनंतर ही महिला आणि बाळं मुळगावी परततील, असं सांगण्यात आलं आहे. डॉक्टर हालीमाच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत आहे. शिवाय या मुलांच्या प्रकृतीवरही डॉक्टर बारीक नजर ठेऊन आहेत. आता तेथील सरकार हालीमा सिसीची खास काळजी घेत आहे.

थोडक्यात बातम्या-

चिंताजनक! गेल्या 24 तासात देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय वाढ

 माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष अजित सिंह चौधरींचं कोरोनामुळे निधन

कोरोना लसीचा दुसरा डोस घ्यायला उशीर झाल्यास लस परिणाम करेल का?; वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतात…

रिषभ पंतची ऐतिहासिक कामगिरी; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय खेळाडू

“मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण देणे हा एकच पर्याय”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More