बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात पुन्हा वाढ; वाचा आजची आकडेवारी

नवी दिल्ली | देशात गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः हाहाकार माजवल्याचं पहायला मिळलं होतं. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच देशात वेगानं लसीकरण सुरु करण्यात आलं. यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे. अशातच देशातील नव्या कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

गेल्या 24 तासात भारतात 42 हजार 909 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 380 रुग्णांना प्राण गमवावे लागले. काल दिवसभरात देशात 34 हजार 763 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. देशभरात सध्या 3 लाख 76 हजार 324 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना झालेल्या 3 कोटी 26 लाख 91 हजार 180 रुग्णांपैकी 3 कोटी 19 लाख 23 हजार 405 रुग्ण बरे झालेत.

आतापर्यंत देशभरात 04 लाख 37 हजार 701 जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. देशातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असतानाच हळूहळू कोरोना आटोक्यात येत असल्याचं पहायला मिळत होतं मात्र, आता रूग्णसंख्या पुन्हा वाढताना दिसत आहे.

दरम्यान, भारतात लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. आतापर्यंत 63 कोटी 43 लाख 81 हजार 358 नागरिकांचं लसीकरण झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. मात्र, त्यात आता डेल्टा प्लस व्हायरस आल्यानं अजून चिंतेत भर पडली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘अमित शहा यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा’; काँग्रेसची मोठी मागणी

भारतीय खेळाडूंकडून लयलुट सुरूच; आणखी 3 पदकं भारताच्या खात्यात

‘शेतकऱ्यांची डोकी फोडून तुम्हाला जनआशीर्वाद मिळणार का?’; शिवसेनेचा संतप्त सवाल

अवनीची ऐतिहासिक कामिगरी! अवनी लेखराने पटकावलं सुवर्णपदक

अमेरिकेचा एअर स्ट्राईक! ड्रोन राॅकेटचा वापर करून आयसीसचा मोठा डाव उधळला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More