बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रिक्षाचालकाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर

सिंधुदुर्ग | देशात कोरोनाने थैमान घातलं आहे. अशातच बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. या कारणांमुळे देशात मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यु होत आहे. यादरम्यान एक विचित्र घटना समोर आली आहे. सिंधुदुर्गमधील कणकवली येथील रिक्षाचालकाच्या आत्महत्येने संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना कणकवली शहरातील हळवल रेल्वे फाटकाजवळ घडली आहे. संबंधित मृत रिक्षाचालकाचं नाव वासुदेव दत्ताराम लाड असं आहे. वासुदेव हे 50 वर्षांचे असून काही दिवसांपासून ते आजारी होते. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास रेल्वे ट्रॅकमन गस्त घालताना त्यांना हळवल रेल्वे फाटकाजवळ लाड यांचा मृतदेह आढळला. रेल्वेची धडक बसून डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

ट्रॅकमनने कणकवली रेल्वे स्टेशनमास्तर आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कणकवली पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास चालू केला. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवल्याचं पोलिसांनी सांगितलं. ती चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

दरम्यान, वासुदेव यांच्या परिवरात त्यांची पत्नी आणि त्यांच्या तीन मुली आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर संपुर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच
कणकवली पोलिस ठाण्यात त्यांच्या मृत्यूची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. संबंधित घटना ही रात्री सुमारे साडे दहाच्या सुमाऱ्यास घडली आहे.

थोडक्यात बातम्या-

देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट, जाणुन घ्या दिलासादायक आकडेवारी

“तुमच्या ‘तिसरी लाट’ या चित्रपटामध्ये मला मृतदेह मोजण्यासाठी स्पाॅट बाॅयचं काम द्या”

भारतात कोरोनामुळे जळणाऱ्या सरणावरून खिल्ली उडवणं ‘या’ पक्षाला पडलं महागात

मी रस्त्यावर उतरून लढणारी बाई आहे; भाजपला तर 50 जागाही मिळाल्या नसत्या, जर…

पुढच्या 2 दिवसात राज्यभरात गारपिटीची शक्यता; हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना ‘हे’ आवाहन

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More