बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

5 रूपयांचा एक समोसा मग 4 कितीचे?; लहान मुलाच्या निरागस युक्तीवादाचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई | सोशल मीडियावर आज काल अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात अनेकदा लहान मुला-मुलींचे काही व्हिडीओही असतात. त्यातील काही व्हिडीओ प्रेरणा देणारे असतात, तर काही व्हिडीओ खूपच मजेशीर असतात.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक घरकाम करणाऱ्या बाईचा आणि काही तरूणांचा पैसे मोजतानाचा व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ 1800 रूपये या नावानेही अनेक ठिकाणी शेअर करण्यात आला होता. अशातच यासारखाच एका लहान मुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की, सध्या सगळीकडे कोरोना रोगाने थैमान घातलं आहे. त्यामुळे अनेक उद्योग-धंदे बंद पडले आहेत. अशा परिस्थितीत हातावर पोट असणाऱ्याचेही खूप हाल चालले आहेत.

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील लहान मुलगा आपली पोटाची खळगी भरण्यासाठी दारोदारी जाऊन समोसे विकत आहे. एका ठिकाणी तो मुलगा समोसे विकण्यासाठी थांबतो. समोसे दिल्यानंतर पैसे घेताना त्या ग्राहकाबरोबर त्याने घातलेला वाद प्रचंड व्हायरल झाला आहे.

एक महिला त्याच्याकडून चार समोसे विकत घेते आणि एका समोस्याची किंमत 5 रूपये या हिशोबाने त्याला 4 समोस्यांचे पैसे देते. परंतू, तो मुलगा ते घेत नाही. तो म्हणतो की हे पैसे कमी आहेत, तर ती महिला त्याला हिशोब समजावून सांगत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे.

चार समोस्यांचे 20 रूपये झाले असल्यानं ती महिला त्याला तेवढे पैसे देते. त्यानंतर तो मुलगा तिला म्हणतो की एक समोसा 5 रूपयांनी याप्रमाणे चार समोस्यांचे 40 रूपये झाले आहेत. मग ती महिला त्याला सविस्तर हिशोब सांगत आहे. ती म्हणते जर एक समोसा 5 रूपयाचा असेल, तर चार समोसे 20 रूपयांचे झाले. त्यावर तो म्हणतो नाही चार समोस्यांचे 40 रूपये झाले आहेत. त्यावर तो अडून राहतो. त्या मुलाचा हा निरागस युक्तीवाद अनेकांना भावला आहे.

पाहा व्हिडीओ –

थोडक्यात बातम्या-

एका पत्रकाराला अटक करण्यासाठी सरकारी यंत्रणांनी थेट विमानाचं केलं अपहरण, वाचा संपुर्ण प्रकरण

‘राज्यपालांनी 12 आमदारांच्या फाईलवर सही केली तर पेढे वाटू’; संजय राऊतांचा राज्यपालांना टोला

प्रेम केल्याची जीवघेणी शिक्षा, कोल्हापुरात प्रेयसीच्या वडिलांच्या भितीने युवकाची आत्महत्या

PNB घोटाळ्यातील आरोपी मेहूल चोक्सी 3 दिवसांपासून गायब; पोलिसांचा तपास सुरू

शाइनिंग करत पिसाळलेल्या रेड्यावर रायडिंग करायला गेला अन्…, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More