बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रायगडमध्ये दुर्घटनांची मालिका सुरुच; हिरकणीवाडीत दरड कोसळली

रायगड | रायगड जिल्ह्यातील तळीये गावातही दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. 22 जुलैला दरड कोसळल्यामुळे आतापर्यंत 40 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरडीखाली अजूनही नागरिक अडकल्याची भीती आहे. इथे रेस्क्यू ऑपरेशन अजूम सुरु आहे. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक दरड कोसळण्याची घटना समोर आली आहे.

रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी हिरकणीवाडीत दरड कोसळली आहे. हे गाव डोंगराळ भागात आहे. इथे सतत पाऊस होत आहे. मात्र घरांचं नुकसान झालं नसल्याची माहिती आहे. हिरकणीवाडीतील नागरिक भयभीत झाले आहेत. पाचाड गावाजवळ ही हिरकणीवाडी आहे. हिरकणीवाडीतील नागरिकांना पाचाड गावात हलवलं जात आहे.

 दरड कोसळून झालेली ही दुर्घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून परिस्थिती किती भीषण आहे हे दिसतंय.

दरम्यान, तळीये गावातील 35 घरांवर दरड कोसळली आणि होत्याचं नव्हतं झालं. अनेक नागरिकांचा यात मृत्यू झाला असून अद्यापही काही नागरिक बेपत्ता आहेत. घटनास्थळी बचावकार्य आणि शोधमोहिम मोठ्या वेगाने सुरू आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफच्या टीम घटनास्थळी कार्यरत आहेत. 

थोडक्यात बातम्या-

“इतका वेगवान मुख्यमंत्री महाराष्ट्राच्याच काय देशाच्या इतिहासात झाला नसेल”

मृत म्होरक्याचा वाढदिवस अन् रावण टोळीचा प्लॅन, पोलिसांनी दाखवला इंगा!

#TokyoOlympics | मिराबाई तुझा भारताला अभिमान, मिळवून दिलं पहिलं पदक

तळीये गावात क्षणात होत्याचं नव्हतं झालं, सलग 40 मृतदेह रांगेत!

प्रसिद्धीसाठी कायपण! ‘या’ 7 अभिनेत्रींच्या न्यूड फोटो-व्हिडीओंचा इंटरनेटवर धुमाकूळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More