“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वापेक्षा शरद पवार साहेबांचं नेतृत्व मोठं वाटतं”
मुंबई | बेळगाव सीमा प्रश्नावर समन्वय साधण्यासाठी शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) या दोन मंत्र्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र या मंत्र्यांचा दोन वेळा ठरलेला दौरा आतापर्यंत रद्द करण्यात आला.
सरकारला जमत नसेल आणि मराठी भाषिकांवरील अन्याय वाढतच गेला तर आम्हाला बेळगावात जावं लागेल, असा इशारा शरद पवार तसेच संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही दिला आहे. यावर आज शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना त्यांनी राऊतांवर सडकून टीका केलीये.
मोठ्याने बोलायचं, बाह्या सावरून बोलायचं, ही राऊत यांची पद्धत बोलायची कुणीही सहन करणार नाही. संजय राऊत तोंड आवरा. साडे तीन महिन्यांचा आराम करून आलायत, असं शंभूराज देसाई म्हणालेत.
तुमच्या बडबडण्यावरून बाहेरचं वातावरण तुम्हाला सुट होत नाही. पुन्हा आराम करायची वेळ येऊ नये, अशी वक्तव्य टाळावीत, असा इशारा शंभूराज देसाई यांनी दिला.
दरम्यान, पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली बेळगावला जाणार असं संजय राऊत म्हणालेत. मग उद्धव ठाकरे यांचं नेतृत्वापेक्षा त्यांना पवार साहेबांचं नेतृत्व मोठं वाटतं, अशी टीका त्यांनी केलीये.
महत्त्वाच्या बातम्या-
- एकनाथ शिंदेंनी फडणवीसांचा केला ‘लाडके मुख्यमंत्री’ उल्लेख, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- भाजप मंत्र्याच्या अडचणीत वाढ; लिव्ह इन रिलेशनशिप प्रकरण पुन्हा चर्चेत
- शिंदे-फडणवीस सरकारची सर्वात मोठी घोषणा!
- 1 रुपयाच्या शेअरचा मोठा धमाका; गुंतवणूकदार झाले करोडपती
- कॅनरा बँकेच्या ग्रहकांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ नियमात झाला बद
Comments are closed.