बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

#सकारात्मक_बातमी | सात महिन्यांच्या बाळाची कोरोनासह ट्युमरशी यशस्वी झुंज

मुंबई | देशात कोरोनानं अक्षरशः हाहाकार माजवलाय. दररोज कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. कोरोनाने अनेकांचा बळी घेतला आहे. त्यात सध्या बेड आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे आक्सिजनभावी लोकांना आपला प्राण गमवावा लागत आहे. एकीकडे कोरोनामुळे बळी जात असताना वयाची शंभरी पार केलेले तसेच लहान मुलांनी कोरोनाला हरवल्याच्या सकारात्मक बातम्या समोर येत आहेत. आता मुंबईतील अवघ्या सात महिन्यांच्या बाळाने कोरोनाला हरवलं आहे.

बाळाला कोरोनाची लागण झाली हाेती. त्याच्या छातीमध्ये 15 सें.मी. आकाराचा दुर्मीळ ट्यूमर आढळून आला. या बाळावर परेल येथील वाडिया रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले.

15 एप्रिलला बाळाला रुग्णालयात दाखल केलं. त्याला ‘टेराटोमा’ नावाचा ट्युमर हाेता. सर्वांत प्रथम आम्ही बाळाची कोरोना चाचणी केली ती पाॅझिटिव्ह आल्याने बाळाला आठ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवलं. पुन्हा चाचणी केली ती निगेटिव्ह आली. त्यानंतरच बाळावर शस्त्रक्रिया केली, असं रुग्णालयाच्या प्रमुख बालरोग शल्यचिकित्सक डॉ. प्रज्ञा बेंद्रे यांनी सांगितलं.

दरम्यान, बाळाची दोन्ही फुप्फुसे, हृदयाच्या काही भाग आणि शरीरातील सर्वांत मोठी धमनी या साऱ्यांवर ट्युमरमुळे गंभीर परिणाम झाला होता, असंही प्रज्ञा बेंद्रे यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

“मोदींनी महाराष्ट्राचं कौतुक केलं, पण फडणवीस टीका करतात, मग योग्य कोण?”

मक्याच्या शेतातून बँड-बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

“देशात कोरोनामुळे 1 ऑगस्टपर्यंत दहा लाख लोकांचा बळी जाण्याची शक्यता”

“पदोन्नतीमधील 33 टक्के आरक्षण रद्द करण्याचा निर्णय मागे घ्या”

‘मला मनसुख हिरेन व्हायचं नाही’; व्यावसायिकाचा परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More