बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बायकोच्या प्रियकराबद्दल कळल्यानंतर त्याने उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल

जयपूर | लग्नानंतर आपला जोडीदार सोडून नवरा किंवा बायको दुसऱ्याच्या प्रेमात पडल्यानंतर मग यातून अनेक वाद तर होतातच मात्र अनेक गुन्हे देखिल होतात. अशीच एक घटना राजस्थानमधील नागौरमधून समोर आली आहे. पत्नीला दुसऱ्यावर प्रेम झालं म्हणून तिच्या पतिने अत्यंत धक्कादायक कृत्य केलं आहे. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

या घटनेतील महिलेच्या प्रियकराचं नाव इंद्रचंद्र असं आहे. संबंधित महिलेने काही काळापुर्वी आपल्या पतीला सोडलं होतं. या महिलेला दोन मुलं होती. एक मुलगा पतीसोबत राहत होता आणि छोटा मुलगा महिलेसोबत राहत होता. आपल्या पतीला सोडल्यानंतर महिला मृत इंद्रचंद्रच्या संपर्कात आली आणि दोघांमधील जवळीकता वाढली. ही गोष्ट महिलेच्या पतीला समजावल्यानंतरही महिला इंद्रचंद्रला सोडण्यासाठी तयार झाली नाही. २० दिवसांपासून ते सोबत राहत होते.

हा प्रकार समजताच महिलेचा पती आणि त्याच्या नातेवाईकांनी इंद्रचंद्रला मारहाण करून त्याचे पाय तोडले आणि रस्त्यावर मरण्यासाठी सोडून दिलं. रस्त्याने जात असलेल्या काही लोकांनी तरूणाला पाहिलं आणि त्याला नागौरच्या जवाहरलाल नेहरू हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्याची गंभीर स्थिती बघता त्याला जोधपूरला रेफर करण्यात आलं होतं. मात्र तिथेच त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, मृत्युआधी तरूणाने मारहाण करणाऱ्या लोकांची नावे पोलिसांना सांगितली. पोस्टमार्टमनंतर मृतदेह त्याच्या परिवाराकडे सोपवण्यात आला. तसेच या प्रकरणी महिलेने जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक श्वेता धनकडला भेटून जीवाचा धोका असल्याची शक्यता वर्तवली होती. मात्र पोलिसांनी काही मदत केली नाही. तेच पोलिसांनी आरोपीसहीत चार लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सर्वच आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

थोडक्यात बातम्या-

आसाम हादरले! 6.4 रेश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

चिंता वाढली! देशात कोरोना मृ्तांची संख्या 2 लाख पार; रूग्णांसह मृत्युदरही वाढला

‘मोदीजी कृपया राजीनामा द्या…’; कंगणाचं ते ट्विट चर्चेत

‘ज्यांनी लस घेतली, त्यांनी मास्क लावायची गरज नाही’; ‘या’ देशाची मोठी घोषणा

केंद्र सरकार ‘या’ जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत; आरोग्य मंत्रालयाचा प्रस्ताव

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More