बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना पॉझिटिव्ह नवरा अन् गुडघ्याला बाशिंग; कोरोनाबाधित असतानाही नवरदेव चढला बोहल्यावर, अन्…

रत्नागिरी | रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. गुहागर तालुक्यातील शिरगावात चक्क कोरोना पॉझिटिव्ह नवरदेव बोहल्यावर चढला. आपण कोरोना पॉझिटिव्ह आहोत हे नवरदेवाला माहिती होतं. या प्रकरामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

गुहागर तालुक्यातील सडे- जांभारी येथील तरुणाचा 4 मे रोजी कोरोनाबाधित असल्याचा रिपोर्ट आला होता. पण त्यानंतर देखील या तरुणाने बोहल्यावर चढण्याचा निर्णय घेतला. पाच मे रोजी या तरूणाने लग्न देखील केलं. शिवाय कोरोना काळातील सारे नियम देखील मोडले.

नवरदेवच कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे सर्व वऱ्हाडी मंडळींना गृह विलगीकरणात राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. इतकंच नाही तर परवानगीचा भंग केल्याप्रकरणी आणि ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा विवाह सोहळा लांबल्याप्रकरणी ग्रामपंचायतीने नवरदेवाच्या कुटुंबाला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील सध्याची सारी परिस्थिती पाहता या नवरदेवाच्या उतावळीपणामुळे सध्या अनेक लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे.

थोडक्यात बातम्या- 

“अशोकराव, जे तुम्हाला जमलं नाही, त्याचं खापर देवेंद्रजींच्या डोक्यावर फोडता येणार नाही”

दिलासादायक बातमी! राज्यात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या अधिक

…म्हणून पिंपरीच्या पोलीस आयुक्तांनी केलं वेशांतर, बनले जमालखान कमालखान पठाण अन्…

“…अन्यथा एकाही मराठा आमदार, खासदार आणि मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही”

किती ती क्रूरता! गरीब भाजी विक्रेत्याच्या टोपलीवर पोलिसाचा लाथ मारतानाचा व्हिडीओ व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More