पुण्यातील भोर येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार अन् पुढे घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार
पुणे | पुण्यातील भोर तालुक्यातुन अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील रहिवासी असणाऱ्या एका तरुणाने एका अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला असल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार यावरच थांबला नसून त्यानंतर जे घडलं ते देखील धक्कादायक आहे. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
संबंधित घटना ही भोर तालुक्यातील वेनवडी गावातील आहे. येथे रहिवासी असणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करण्यात आला आहे. संबंधित आरोपीचं नाव विशाल दत्तात्रय चव्हाण असं असून तो देखील वेनवडी येथील रहिवासी आहे. विशाल याने पीडित मुलीवर एकाच महिन्यात तब्बल चार वेळा बलात्कार केला आहे.
या प्रकारानंतर पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने ही घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर मुलीने यामागील धक्कादायक सत्य देखील सांगितलं आहे. मुलीने याबाबत सांगताना विशालने तिला धमकी दिली असल्याचं म्हटलं आहे. झालेल्या अत्याचाराबद्दल कोणाला सांगितल्यास तुला आणि तुझ्या कुटुंबियांना जीवे मारण्यात येईल, अशी धमकी विशालने मुलीला दिली होती.
दरम्यान, या संपुर्ण प्रकरणानंतर पीडित मुलीच्या आईने विशालच्या विरुद्ध तक्रार नोंदवली आहे. मात्र विशाल आता फरार असल्यानं पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तसेच या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच चर्चा रंगली आहे.
थोडक्यात बातम्या-
‘आधी लस घ्या मगच पगार मिळणार’; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर लसीकरण केंद्रावर गोंधळ
सिगरेटचे चटके देत अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; जाब विचारण्यासाठी गेलेल्या आईला…
“अजित दादा जरा सांभाळून बोला, मी फाटक्या तोंडाचा आहे, बोलायला लागलो तर…”
…अन् रिषभ पंतने प्रशिक्षकालाच गोल गोल फिरवलं, पाहा व्हिडीओ
“…तर बाळासाहेब ठाकरे वरून तुमच्या थोबाडीत मारतील”
Comments are closed.