बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रेयसीवर संशय घेऊन मध्यरात्री तिच्या घरी जाणं प्रियकराच्या जीवावर बेतलं; घडला धक्कादायक प्रकार

पुणे | पुण्यातील पिंपरी येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. विवाहीत महिलेसोबत प्रेमसंबंधात असणाऱ्या प्रियकराला आपल्या प्रेयसिवर संशय आल्याकारणाने त्याने चक्क मध्यरात्री थेट तिचं घर गाठलं. मात्र तिच्यावर संशय घेणं त्याला जिवावर बेतलं. मध्यरात्री घरी गेल्यावर दोघांमध्ये वाद पेटला. हा वाद घरात ऐकू गेल्यानंतर धक्कादायक प्रकार घडला.

विवाहीत महिलेने याबाबतची तक्रार नोंदवली आहे. तक्रारीमध्ये संबंधित महिलेने तिच्या भावासोबत आणखीन 17 जणांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. संबंधित महिला तिच्या पती आणि मुलांसोबत झोपली असताना अचानक कोणीतरी मागच्या दरवाजावर दगड फेकत असल्याचं महिलेला समजलं म्हणून ती झोपेतून उठली. त्यानंतर कोणीतरी तिच्या घराचं दार वाजवल्यामुळे तिने दार उघडल्यावर तिचा प्रियकर मध्यरात्री तिथं दिसला.

प्रियकराने त्या मध्यरात्री आपल्यावर संशय घेऊन इतका वेळ झाला तरी तू दरवाजा का उघडत नव्हतीस आणि बेडरुम बाहेर कोणाच्या चप्पल आहेत असा सवाल केला, असं प्रेयसीने पालिसांना सांगितलं आहे. यावर आपला मामाचा मुलगा आणि त्याची पत्नी आत झोपली असल्याचं महिलेने सांगितलं. मात्र प्रियकर त्यांना बाहेर बोलवण्याचा हट्ट करत असल्यामुळे त्या दोघांमध्ये वाद पेटला.

दरम्यान, दोघांच्या वादाचा आवाज ऐकून मामाचा मुलगा बाहेर आला. त्यानंतर हा वाद टोकाला गेला की मामाच्या मुलाने त्याच्या मित्राला बोलावलं. त्यानंतर संबंधित प्रियकराला टेरेसवर नेऊन त्याला मारहाण करुन टेरेसवरुन खाली फेकलं. यामध्ये प्रियकराचा मृत्यू झाला आहे. अक्षय अनिल काशीद असं खुन झालेल्या तरुणाचं नाव असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी जॉन अब्राहम आला धावून; उचललं हे मोठं पाऊल!

चंद्रपूर हळहळला! अवघ्या 35 वर्षीय डाॅक्टराचा कोरोनामुळे मृत्यू

कोरोनाच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट, तरुणानं शेअर केला धक्कादायक अनुभव

प्रसिद्ध अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचं कोरोनानं निधन!

कोरोनाने उद्धवस्त केला नवदाम्पत्याचा संसार; अवघ्या तीन दिवसात नवरदेवाला कोरोनाने गाठलं

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More