बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…अन् 100 प्रवाशांनी भरलेली बोट क्षणात आडवी झाली’; पाहा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ

दिसपूर | आसाम येथील ब्रम्हपुत्रा नदीत दोन बोटींचा भीषण अपघात झाला. या घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही काळजाचा थरकाप उडेल. आसाममधील या घटनेनं सर्वांना हैराण करुन सोडलं आहे. या अपघातात अनेक लोक बेपत्ता देखील झाले आहे.

सुमारे 100 प्रवाशांना विरुद्ध दिशेने घेऊन जाणाऱ्या दोन बोटींची टक्कर झाल्याने आसाममध्ये खळबळ उडाली आहे. समोरुन बोट येताना दिसताच बोटीमधील नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. त्यानंतर टक्कर होताच अनेक प्रवाशी उडून थेट पाण्यात पडले. यामध्ये 50 पेक्षा जास्त प्रवाशी बेपत्ता झाले आहेत.

या अपघातात एक बोट आडवी झाली आहे. या अपघातात एकूण 43 जणांना वाचवण्यात यश आलं आहे तर एक मृतदेह देखील सापडला आहे. मात्र अजूनही काही लोक बेपत्ता आहेत. त्यांचा शोध देखील सुरु आहे. एखाद्या थरारक चित्रपटासारखा हा अपघात झाला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. तसेच तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आलं असल्याचं मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी म्हटलं आहे. या घटनेच्या व्हिडीओने सर्वांच्या आंगावर काटा आणला आहे.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

एकनाथ खडसे सध्या सत्ताधारी गटात असले तरी गुन्हा घडताना ते भाजपमध्ये होते- ईडी कोर्ट

भाजपसारखी सुपाऱ्या घेण्याची सवय आम्हाला नाही- रूपाली चाकणकर

राज्य सेवा परीक्षा 2019 निकालासंदर्भात महत्वाची बातमी!

माझ्यासारखा नेता तुम्हाला मिळणार नाही- चंद्रकांत खैरे

सकाळी आरोप, संध्याकाळी त्याच्याशीच लग्न; पंकज तडस आणि पूजा यांचा वैदिक पद्धतीनं विवाह

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More