‘हे’ पदार्थ खात असाल तर आताच व्हा सावध; अभ्यासातून धक्कादायक खुलासा समोर
मुंबई | युनायटेड किंग्डम येथील एका अभ्यासातून धक्कादायक खुलासा समोर आला आहे. 1,97,000 हून अधिक प्रौढ नागरिकांच्या डेटाचे जवळपास 10 वर्षे विश्लेषण करण्यात आलंय. ज्यामध्ये असे आढळून आले की कॅन्सरचा (Cancer) धोका आणि कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंमागे (death) अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडचाही हात आहे.
या संशोधनात सहभागी झालेल्या 1,97,426 सहभागींपैकी 15,921 लोकांना कॅन्सर झाला होता आणि तर 4,009 लोकांचा कॅन्सरमुळे मृत्यू (Death) झाला.
वॅमोस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना असे आढळून आले की एखाद्या व्यक्तीच्या आहारातील अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडच्या प्रमाणात 10 टक्के वाढ झाल्याने सर्व कॅन्सरचा धोका 2 टक्क्यांनी वाढतो, परंतु गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका 19 टक्क्यांनी वाढल्याचं दिसून आलं.
अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड सेवनाचा दर 10 टक्के वाढल्यास कॅन्सरमुळे मृत्यू होण्याचा धोका 6 टक्क्यांनी वाढतो आणि गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे मृत्यू होण्याचा धोका 30 टक्क्यांनी वाढतो. तसेच स्तनाच्या कॅन्सरचा धोका 16% वाढतो.
दरम्यान, चांगले आरोग्य राखण्यासाठी, शक्य तितके ताजे, घरी शिजवलेले अन्न खाणं महत्वाचं आहे. आहारात हंगामी फळे आणि भाज्यांचा समावेश करणे आवश्यक आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.