बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रडण्यानेही वजन कमी होतंय, कसं ते वाचा सविस्तर

नवी दिल्ली | अनेकांना लठ्ठपणाच्या समस्यामुळे आयुष्यात गंभीर परिमाणांना समोरं जावं लागतं. त्यामुळे आपण वजन नियंत्रित ठेवण्यासाठी नानाप्रकाराच्या गोष्टी करत असतो. तरी देखील आपलं वजन नियंत्रित राहू शकत नाही. अलिकडेच वजन कमी करण्याची सोपी पद्धत एका संशोधनाने शोधून काढली आहे.

द मिस्ट्री ऑफ टीयर्स या मासिकेमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात विल्यम फ्रे या संशोधकांनी ही नवीन पद्धत शोधून काढली आहे. रडणे हे तुमच्या भावनेशी संबंधित आहे. जी एक भावनिक कृती आहे. तुम्ही दु:खी असताना, चित्रपट पाहताना, पुस्तक वाचताना किंवा तुमच्या डोळ्यासमोर एखादी घटना घडताना रडत असतो. या काळात तुमचे वजन कमी करण्यात तुमचे रडणे मदत करू शकते.

जेव्हा आपण रडतो तेव्हा आपले शरीर कॉर्टिसॉल हार्मोन सोडते. आपल्या शरीरातील कोर्टिसोल हार्मोनच्या या वाढीव पातळीमुळे चरबी कमी होते. तणावामुळे बाहेर पडणारे अश्रू आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात, जे वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम आहे, असं विल्यम फ्रे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, तसेच विल्यम फ्रे यांनी सांगितलं आहे की, खोटे अश्रू रडल्याने तुमच्या वजनावर कोणतेही परिणाम होणार नाहीत. हे लक्षात ठेवा. दिवसातून 7 ते 10 वेळा रडून तुम्ही नकारात्मक भावांनापासून मुक्त होऊ शकता. ज्यावेळी तुम्ही रडतात तेव्हा शरीरातील कोर्टिसोलची पातळी कमी होते. ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

थोडक्यात बातम्या-

शासनाचा सावळा गोंधळ! दिवाळी सुट्ट्यांची तारीख अचानक बदलली

“एकनाथ खडसे स्वत:ला मुख्यमंत्रिपदाच्या पातळीचे समजायचे मग पराभव का झाला?”

मोठी बातमी! नीरज चोप्रासह अन्य 11 खेळाडूंची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

न्यूझीलंडला धक्क्यावर धक्के! भारताविरूद्धच्या सामन्याआधी 2 दिग्गज खेळाडू दुखापतग्रस्त

30 वर्ष जुना प्रश्न संपुष्टात, फडणवीसांनी मानले मोदी-शहांचे आभार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More