बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल’; अजित पवारांचं मोठं वक्तव्य

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात मिनी लाॅकडाऊन लावण्यात आला आहे. राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहे. शनिवारी आणि रविवारी पूर्ण लाॅकडाऊन असेल. परंतु आगामी काळातील सार्वजनिक सुट्ट्या पाहता राज्यात काही दिवस पूर्ण लाॅकडाऊन लावला जाऊ शकतो. याच संदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 5 वाजता सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक सुचक वक्तव्य केलं आहे.

बारामतीत अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठक घेतली. राज्यात शासकीय रुग्णालयात इंजेक्शनची कमी पडत नाही. जी काही समस्या आहे ती खाजगी रुग्णालयात आहे. त्यामागील काही वेगळी करणं समोर आली आहेत. पुणे जिल्ह्यातील कशा प्रकारे उपाययोजना राबवायच्या यावर पुण्यात बैठक होणार आहे. संपूर्ण राज्यात एकच निर्णय घेतला जाईल. प्रत्येक ठिकाणी वेगळा वेगळा निर्णय घेऊन चालणार नाही, असं अजित पवार यांनी म्हटलंय.

सोमवारपासून दुकानं उघडू द्या, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. या मुद्यावर देखील चर्चा होईल, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सध्याचा विकेंड लाॅकडाऊन उपयोगाचा नसून राज्यात 3 आठवड्याचा लाॅकडाऊन करावाच लागेल, असं मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. त्यानंतर राज्यात पुन्हा पुर्णतः लाॅकडाऊन लागेल की काय? अशी भिती लोकांमध्ये आहे. तर यासंदर्भात शनिवारी मुख्यमंत्री एक महत्वाची बैठक घेणार आहेत.

थोडक्यात बातम्या-

मुंबईत फेब्रुवारीमध्ये कोरोनाचे 18 हजार रुग्ण, मार्चमधील आकडा मात्र धक्कादायक

भारताच्या सागरी सीमेत अमेरिकन नौदलाची घुसखोरी; भारत-अमेरिकेतील संबंधांवर परिणाम?

‘त्यानं फक्त माझा वापर केला’; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीनं केला मोठा गौप्यस्फोट

धक्कादायक! 2 वर्षाच्या चिमुकलीचं अल्पवयीन मुलाने केलं लैंगिक शोषण

धावत्या रिक्षात महिलेवर बलात्काराचा प्रयत्न; रिक्षा न थांबवल्यानं महिलेनं उचललं धक्कादायक पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More