बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माज यालाच म्हणतात का?, कृणाल पांड्याच्या कृतीवर सोशल मीडियात एकच चर्चा

मुंबई | आयपीएलमधील मुंबई इंडिअन्सचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याच्या कृतीवर नेटकरी खवळले आहेत. मुंबई इंडिअन्स आणि राजस्थान रॉयल्समधील सामना चालू असताना हा किस्सा घडला. मुंबईने हा सामना जिंकला मात्र कृणालच्या या वागण्याची चर्चा सोशल माध्यमांवर आहे.

पंधराव्या षटकात फलंदाजी करत असताना गोलंदाज राहुल तेवतियाच्या चेंडूवर त्याने एक चोरटी धाव घेतली. चोरटी धाव काढताना डाय मारल्याने हात कोरडा झाल्याच कृणालला जाणवलं. त्यानंतर त्याने मॉइश्चरायझर मागवला. यावेळी बाकावर असलेला अष्टपैलू अनुकूल रॉय मॉइश्चरायझर घेऊन आला.

कृणालने ती क्रिम घेऊन हातावर लावली. मग अनुकूलने मॉइश्चरायझरची बॉटल पकडण्यासाठी हात पुढे केला होता. परंतु कृणालने त्याच्याकडे पाहिलेदेखील नाही. त्याने हातातली मॉइश्चरायझरची बॉटल फेकली आणि तो क्रिजकडे निघून गेला. कृणालने 26 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकार मारत 39 धावा चोपल्या. 16.4 षटकात मुस्तफिजुर रेहमानने बोल्ड केलं.

दरम्यान, कृणालच्या अशा वागण्याने त्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.  याआधीही तो एका सामन्यात षटक टाकत असताना क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूवर संतापलेला दिसला होता. तर बडोदा संघाकडून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळताना संघ सहकारी दीपक हुडासोबतही चुकीच्या पद्धतीने वागला होता.

 

थोडक्यात बातम्या- 

‘माझ्याकडून पैसे घेते आणि दुसऱ्यांशी बोलते’; संतापलेल्या प्रियकराने केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच शरद पवारांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पेटारा उघडला, केली मोठी मदत

‘बाळांनो, आम्ही लगेच येतो’ सांगून कोरोना उपचारासाठी गेलेल्या दाम्पत्याला कोरोनाने गाठलं

कडक सॅल्यूट! पत्नीचे दागिने विकून पठ्ठ्याने रिक्षाला बनवलं रुग्णवाहिका

शिक्षक असलेल्या पतीने पत्नीचा आणि 13 महिन्यांच्या मुलाचा गळा चिरुन केला खून; कारण अत्यंत धक्कादायक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More