बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना सेंटरमध्ये साप घुसल्यानं उडाली खळबळ, अन्….

नवी दिल्ली | देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या जशी वाढतेय, तशी मृतांची संख्याही मन हेलवणारी आहे. एकीकडे कोरोनाबाधितांचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. तर दुसरीकडे आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात.

राजस्थानमधील भरतपूरच्या महिला पॉलिटेक्निक महाविद्यालयामध्ये तयार करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये तब्बल सहा फूट लांब साप घुसल्यानं गोंधळ उडाला. कोविड केंद्रात साप असल्यानं डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारीही चांगलेच घाबरले.

कोरोना केंद्राकडून याबाबत वन विभागाला तातडीनं माहिती दिल्यानंतर जवळच असलेल्या केवलादेव राष्ट्रीय उद्यानातील काही कर्मचार्‍यांनी येऊन शोध मोहीम राबवली. त्यांनी बऱ्याच प्रयत्नानंतर या सापाला सुरक्षितरित्या पकडले. सुदैवानं कोरोना केंद्रामध्ये कोणावरही सापाने हल्ला केला नाही, अन्यथा परिस्थिती आणखीनच बिकट झाली असती.

दरम्यान, राज्यांत दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जात आहे. अशा संकट काळात अनेक लोक पुढे येत सढळ हातानं मदत करत आहेत.

थोडक्यात बातम्या – 

लहान मुलांसाठी कोरोनाची तिसरी लाट किती घातक असेल?; एम्सच्या संचालकांनी दिली माहिती

पंतप्रधानांसोबतच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला नेलं असतं तर….- देवेंद्र फडणवीस

ठाकरे आणि मोदी भेटतात तेव्हा चर्चा तर होणारच- संजय राऊत

“अमरावतीची जनता पुन्हा तुम्हाला रिटेकची संधी देणार नाही, खासदारकीचा राजीनामा द्यावा”

‘पंतप्रधानांना भेटण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी…’; मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरेंच्या भेटीवर उदयनराजेंचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More