बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारेे असणार विशेष परीक्षेचं आयोजन, जाणून घ्या!

मुंबई | शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील दहावी आणि बारावीच्या परिक्षांबाबत मोठी घोषणा केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी होत होती. मात्र दुर्गम भागात ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेणं कठीण असल्यानं ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा घेणार असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं आहे.

कोरोनाची आकडेवारी पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्यात आता ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेणार म्हटल्यावर धोका हा आहेच. त्यामुळे शिक्षण मंडळाने सुरक्षात्मक उपाययोजनाही रावबल्या आहेत. परंतू एखाद्या विद्यार्थ्याला परिक्षेच्या वेळेत कोरोना झाला तर मग?, यावरही सरकारने उपाय काढला आहे. तो म्हणजे संबंधित विद्यार्थ्यांसाठी विशेष परिक्षेचं आयोजन केलं आहे.

एखाद्या विद्यार्थ्यांस परीक्षा कालावधीमध्ये कोरोनाची काही लक्षणे जाणवत असल्यास किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अथवा लॉकडाऊन, कन्टेनमेंट झोन, संचारबंदी अभावी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षेचे आयोजन जुन महिन्यामध्ये करण्यात येणार आहे. सदरची परीक्षा केंद्रे शहरी भागात ठराविक ठिकाणी आणि ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येणार आहे.

दरम्यान, दहावीच्या परीक्षा 29 एप्रिल ते 21 मे दरम्यान आणि इयत्ता बारावीच्या परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे या नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाईनच होणार आहे. कोविड परिस्थितीमुळे लेखी परीक्षा त्याच शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात येणार आहेत. अपवादात्मक परिस्थितीमध्ये वर्गखोल्या कमी पडल्यास लगतच्या शाळेमध्ये परीक्षा उपकेंद्रामध्ये परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

 

दहावी आणि बारावी परिक्षांबाबत शिक्षणमंत्र्यांनी केली मोठी घोषणा, म्हणाल्या…

…म्हणून महिलेने तुरूंगात असलेल्या पतीसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी न्यायालयात मागितली परवानगी!

‘ती’ 45 मिनटं आमच्यासाठी खूप मोठी…; व्हाॅटस अॅपने मानले यूझर्सचे आभार

धक्कादायक! महिलेने आपल्या दीड वर्षाच्या मुलीसोबत विहिरीत उडी घेत संपवलं आयुष्य

‘या’ कारणामुळे 1 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणं महागणार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More