बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी विशेष अधिवेशन बोलावलं जाणार?

मुंबई |  कालपासून विधानसभेचं पावसाळी अधिवेशन चालू आहे. या पावसाळी अधिवेशनातच विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी, अशी मागणी काँग्रेस पक्षानं लावून धरली आहे. तसेच विरोधी पक्षाकडून देखील विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी होत आहे. अशातच आता विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी विशेष अधिवेशन बोलावलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पावसाळी अधिवेशन झाल्यानंतर आता काही महिन्याने नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन पार पडेल. या हिवाळी अधिवेशनापूर्वी विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी विशेष अधिवेशन बोलावलं जाईल, अशा चर्चा राजकीय वर्तुळात आता चालू झाल्या आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सकारात्मक असल्याचे बोललं जात आहे.

दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला आहे. भाजपच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातल्यानं 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे.

निलंबित करण्यात आलेल्या आमदारांमध्ये भाजपचे आशिष शेलार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, अभिमन्यू पवार, जयकुमार रावत, राम सातपुते, नारायण कुचे, हरीश पिंपळे, पराग आळवणी, संजय कुटे, किर्तिकुमार, योगेश सागर यांचा समावेश आहे. भाजपच्या या 12 निलंबित आमदारांनी राज्यपालांची भेट घेऊन निलंबनाच्या कारवाई विरोधात दाद मागितली आहे.

थोडक्यात बातम्या – 

मोगलांना, इंग्रजांना जे जमलं नाही, ते या ठाकरे सरकारने करुन दाखवलं- देवेंद्र फडणवीस

आलिया आणि रणवीरचा ‘हा’ चित्रपट होतोय रिलीज, करणने पुन्हा बनवली प्रेम कहाणी

“दहशतवादी संघटनांनीही जेवढं नुकसान केलं नाही तेवढं गांधी परिवाराने केलं”

“12 आमदारांवरील निलंबनाची कारवाई कायदेशीरच, निलंबन मागे घेण्याचा राज्यपालांना अधिकार नसतो”

‘वासरू मारलं म्हणून कुणी गाय मारत असेल, तर…’; फडणवीसांचा सूचक इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More