बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ ठिकाणी तृतीयपंथीयांसाठी ’विशेष लसीकरण मोहीम’ राबवणार

ठाणे | देशात कोरोनाचा कहर अगदी भयावह करणारा आहे. कोरोना व्हायरसचा विळखा दिवसागणिक वाढत चाललाय. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण मोहिम राबवली जात आहे. अशातच आता ठाणे महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

ठाणे पालिका तृतीयपंथीयांसाठी ’विशेष लसीकरण मोहीम’ राबवणार आहे. उद्या 19 जून रोजी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेच्यावतीनं कोरोना लसीकरण मोहीम व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे.

या मोहिमेअंतर्गत समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न महापालिकेच्या वतीनं करण्यात येत आहे. त्यामुळे एक भाग म्हणून शहरातील तृतीयपंथी देखील या लसीकरणापासून वंचित राहू नयेत यासाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे, असं पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सांगितलं.

दरम्यान, स्वतःचे आधारकार्ड आणि इतर कोणतेही ओळखपत्र असणाऱ्या तसेच ओळखपत्र नसलेल्या तृतीयपंथीना देखील लस देण्यात येणार आहे. महापालिकेच्या पार्किंग प्लाझा या लसीकरण केंद्रावर उद्या 19 जून रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत लस घेता येणार आहे. तरी शहरातील सर्व तृतीयपंथीनी लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.

थोडक्यात बातम्या – 

32 वर्षाच्या करिअरमध्ये सलमान खान पहिल्यांदाच बायोपिकमध्ये झळकणार!

‘एकट्या महिलेवरती हल्ला करणं म्हणजे अस्मिता जोपासणं आहे का?’; चित्रा वाघ यांचा राऊतांना सवाल

ममता बॅनर्जींच्या भाचाच्या कानशिलात लगावणाऱ्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू, हत्या झाल्याचा आरोप

“भाजप आंदोलन करायला आजही घाबरलं नाही, उद्याही घाबरणार नाही”

‘करीनाला ‘सीते’ची भूमिका करु देणार नाही’, करीना कपूरला धमकी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More