बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात साकारला जातोय शरद पवारांचा पुतळा; सुप्रिया सुळेंकडून तोंडभरून कौतूक

पुणे | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा पुर्णाकृती पुतळा पुण्यात साकारला जात आहे. शिल्पकार सुप्रिया शिंदे शरद पवारांचा 9 फुट असलेला मेटलचा पुतळा साकारत आहेत. हा पुतळा पुण्यातील आंबेगाव परिसरात साकारला जात आहे. या पुतळ्याची खासदार सुप्रिया सुळे यांनी पाहणी केली आहे. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी शिल्पकार सुप्रिया शिंदे यांचं तोंडभरून कौतूक केलं आहे.

शरद पवारांचा हा पुतळा पाहिल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत कौतूक केलं आहे. वर्कशॉपमध्ये सुप्रिया शिंदे करत असलेले काम थक्क करणारे आहे. तसेच त्यांनी बालशिवाजी आणि राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे देखणे शिल्प साकारले आहे, असं सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सुप्रिया शिंदे बनवत असलेल्या शरद पवारांच्या मेटलच्या पुतळ्यासाठी दीड टन मेटलचा वापर करण्यात आला आहे. त्यासोबतच शरद पवारांचा हा पुतळा साकारण्यासाठी सुप्रिया शिंदे यांना 8 महिन्यांचा कालावधी लागला आहे, असं सुप्रिया शिंदे यांनी सांगितलं आहे. तसेच दररोज दहा तास काम करून हा पुतळा साकारला आहे, अशी माहिती सुप्रिया शिंदे यावेळी दिली.

दरम्यान, शरद पवारांचा पुतळा बनवण्याचा निर्णय लॉकडाऊनमध्ये घेतला. त्याचप्रमाणे हा पुतळा साकारताना शरद पवारांचे इंटरनेटवरील फोटो आणि व्हिडीओची मदत झाली, असंही सुप्रिया शिंदे यांनी सांगितल आहे.

थोडक्यात बातम्या-

मोदी सरकारची नवी घोषणा! सरकारी शाळेतील मुलांसाठी राबवणार ‘ही’ खास योजना

“आम्ही भाजप नेत्यांची यादी देतो, त्यांच्यावर कारवाई करणार का?”

“पोकळ शब्दांची नाही तर, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज”

“पक्षाला अध्यक्षच नाही मग निर्णय कोण घेतंय?, आता किती दिवस थांबायचं?”

काँग्रेसला आणखी मोठा धक्का! ‘या’ राज्यातील 11 आमदार अचानक दिल्लीला रवाना

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More