देश

मोदी, शहा, डोभाल यांच्या फोटोवर फुली मारलेलं साध्वी प्रज्ञा यांना पत्र!

भोपाळ | खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना एक धमकी पत्र मिळाल्याचं समोर आलं आहे. उर्दू भाषेत असलेल्या या पत्राबरोबर एका चिठ्ठीत पावडर सारखा पदार्थ देखील पाठवला गेलेला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचे फोटो या पत्रात असून त्यावर फुली मारण्यात आलेली आहे. हे पत्र समोर आल्याने एकच खबळबड उडाली आहे.

माझ्या जीवाला धोका आहे, या अगोदर देखील अशा प्रकारचे धमकी पत्र मला आलं होतं. तेव्हा देखील मी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. मात्र आजपर्यंत याबद्दल कोणतीच कारवाई झाली नसल्याचं साध्वी प्रज्ञा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पत्रात माझ्या फोटोसह पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे फोटो आहेत. ज्यांच्यावर फुली मारण्यात आलेली आहे. अशी देखील माहिती साध्वी प्रज्ञा यांनी दिली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या