बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘महिलांचं काम फक्त मुलांना जन्म देणं, त्या कधीही…’; तालिबानी प्रवक्त्यांचं वादग्रस्त वक्तव्य

काबूल | तालिबान्यांनी अफगाणिस्तानमध्ये ताबा मिळवल्यानंतर आता तालिबानने नव्या सरकारची घोषणा केली आहे. नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात महिलांचाही समावेश करण्याच्या मागणीसाठी महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. अफगाणिस्तानमध्ये आता पर्यंत तीन ते चार वेळा महिलांनी तालिबानविरोधात मोर्चे केले आहे. याच पार्श्वभूमीवर तालिबानच्या प्रवक्त्याने महिलांच्याबाबतीत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

मंगळवारी तालिबानविरोधात शेकडो महिलांनी पाकिस्तानच्या दुतावासासमोर आंदोलन केलं. या अगोदर अफगाणिस्तानमधील फ्रिबा काबरजानी या महिलेच्या नेतृत्वाखाली  राज्यपाल कार्यालयासमोर निदर्शने केली होती.  अफगाणिस्तानमधील महिलांना तालिबानी सरकारमध्ये मंत्री बनवले जाणार नाही. महिलांचं काम फक्त मुलांना जन्म देणं इतकंच आहे, असं तालिबानी प्रवक्त्याने म्हटलं आहे.

एक महिला मंत्री होऊ शकत नाही, हे असं आहे जसे तुम्ही तिच्या गळ्यात काहीततरी असे टाकत आहात, जे ती संभाळू शकत नाही, मंत्रिमंडळात एका महिलेचा सहभाग असणे आवश्यक नाही, असं तालिबानच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे, याबाबतीत ‘टोलो’ या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानमधील बॉलिवुड अभिनेत्री वरीना हुसैनने या अगोदर या परिस्थितीवर वक्तव्य केलं होतं. वरीना म्हणाली होती की, तालिबान आता तेथील महिलांना परत मुलं जन्माला घालणारं मशिन बनवलं जाणार आहे. आणि तरूणांच्या मनात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतं.

थोडक्यात बातम्या-

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

‘राणे कुटुंबाची नाही आता क्राईम ब्रांचच्या….’; लुकआऊट नोटीसवरून नितेश राणे संतापले

‘दीड वर्षाचं काम 15 दिवसात करणार’; नितीन गडकरींनी दिला शब्द

नाशिक पोलिसांचा मास्टर प्लॅन! हेल्मेट न घालणं जीवावर नाही तर कानावर बेतणार

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर, आजही दरात घसरण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More