Top News आरोग्य कोरोना महाराष्ट्र मुंबई

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये डॉक्टरांचे टास्क फोर्स नेमणार- अमित देशमुख

मुंबई | कोरोनाविरूद्ध अधिक प्रभावीपणे लढा देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये डॉक्टरांचे टास्क फोर्स नेमण्यात येणार असल्याचं वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितलंय. मुंबईच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टरांचे टास्क फोर्स तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते.

यासंदर्भात बोलताना अमित देशमुख म्हणाले, “रूग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग आपण योग्य पद्धतीने रोखून धरलाय. मात्र मृत्यूदर वाढणं बरोबर नाही. लॉकडाऊन शिथिल केला आहे त्यामुळे रुग्णांच्या संख्येत काही जिल्ह्यांत वाढ होत आहे. रुग्ण शोधणं आणि त्याचे जास्तीत जास्त संपर्क जलदरित्या शोधणं हा एकमेव मार्ग आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये तेथील तज्ज्ञ डॉक्टर्सचे टास्क फोर्स नेमावे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं.”

यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विभागीय आयुक्त, पालिका आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. प्रयोगशाळांमधून चाचणीचे अहवाल लगेच मिळायला हवेत, अशा सूचना असताना काही ठिकाणी 72 तास लागत असतील तर ती गंभीर बाब आहे. कोणत्याही परिस्थितीत ढिलाई नको, असंही मुख्यमंत्री म्हणाले होते.

मुंबईत डॉक्टर्सचा टास्क फोर्स स्थापन केल्याने त्याचा चांगला उपयोग झाल्याचं दिसून आलं. त्यामुळेच, आता प्रत्येक जिल्ह्यात किंवा विभागात असा टास्क फोर्स करणं गरजेचं झालंय. त्यामुळे, प्रत्येक जिल्ह्यात टास्कफोर्स स्थापनेसाठी गतीमान हालचाली सुरु आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

“सर्व मंत्र्यांचा ब्रेन लॉक झालाय, भाजपचं सरकार असतं तर कोरोनाबाबत अशी परिस्थिती उद्भवली नसती”

लिओनेल मेस्सीचा आणखी एक विक्रम, कारकिर्दीत 700 व्या गोलची नोंद

महत्वाच्या बातम्या-

मी माझ्या मुलांना आत्मनिर्भर होण्याचे संस्कार दिले आहेत- अक्षय कुमार

सरकारच्या सूचना पाळून उत्सव साजरा करण्याची हीच ती वेळ- आशिष शेलार

घराणेशाहीबाबत सैफ अली खानचं मोठं वक्तव्य, म्हणाला….

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या