बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राजीव सातव यांच्या प्रकृतीसंदर्भात समोर आली महत्वाची माहिती!

पुणे | काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची प्रकृती स्थिर असून कुठलीही गंभीर लक्षणं त्यांना नाहीत. केवळ पर्यवेक्षण आणि रुटीन तपासणीसाठी मुंबई येथील पथक येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

खासदार राजीव सातव यांची तब्येत स्थिर असून त्यांना मुंबईत हलवलं जाणार नाही. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना उपचारासाठी पुणे येथील जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या प्रकृतीबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही फोन करून विचारणा केली होती. या सोबतच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहिलोत, यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांच्या प्रकृतीबाबत चौकशी केली जात आहे. तर, राज्यमंत्री विश्वजीत कदम पुण्यातच आहेत.

राजीव सातव मागच्या आठवड्यातच हिंगोली येथे आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा आणि रुग्णांची परिस्थिती याची सविस्तर चौकशी केली होती. जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावर काय उपाययोजना कराव्या लागतील याची माहितीही त्यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची भेट घेऊन घेतली होती. त्यानुसार त्यांनी पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांना हिंगोली जिल्ह्यातील सुविधांबाबत कळविलं होतं.

दरम्यान, आम्ही सर्व आरोग्य सुविधांवर लक्ष ठेऊन आहेत. खासदार सातव यांची प्रकृती स्थिर असून कुठल्याही प्रकारचा धोका नाही. त्यांना मुंबई येथे हलवलं जाणार नाही. मात्र मुंबई येथील लीलावती रूग्णालयातील पथक त्यांची तपासणी करण्यासाठी येणार आहेत. त्यांची तपासणी केवळ रूटीन तपासणी आहे, असं शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या

“9 लाख 17 हजार नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या खात्यात थेट पैसे जमा केले”

उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीचं आनंद महिंद्रांकडून कौतुक, म्हणाले…

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण!

उद्या बहिणीचं लग्न, आज भावाचा दुर्दैवी मृत्यू; इचलकरंजीतील हृदयद्रावक घटना

लस घ्याच! लसीकरणानंतर मृत्यूचं प्रमाण केवळ 0.00005 टक्के

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More