बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोरोनापासून संरक्षण मिळवण्यासाठी लसीचा तिसरा डोसही घ्यावा लागेल”

नवी दिल्ली | कोरोनामुळे देशभरात संकट वाढलं आहे. कोरोनावर लसीकरण हाच एक प्रभावी उपाय समजला जात आहे. परंतू अद्याप देशातील बरेच नागरिक लसीच्या पहिल्या डोसाची प्रतिक्षा करत आहेत.यातच आता कोरोनापासून सुरक्षा मिळण्यासाठी कदाचित कोरोना लशीचा तिसरा डोस घ्यावा लागू शकतो, असं एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं आहे.

कोरोना विरूद्ध लढ्यात लशीचे दोन डोस अनिवार्य आहेत. लसीच्या कमतरतेमुळे लसीचा पहिला डोसही मिळणं अशक्य झालं आहे. मात्र आता रोगप्रतिकारक शक्ती टिकली नाही तर कदाचित तिसऱ्या डोसचीही गरज भासू शकते, असं वक्तव्य एम्सचे डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी केलं आहे.

कोरोना लसीचा तिसरा डोस घ्यायचा की नाही, हे दोन बाबींवर अवलंबून आहे. एक म्हणजे कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतर मिळणारी रोगप्रतिकारक शक्ती किती काळ टिकते आणि दुसरं म्हणजे कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे कोरोना लशीचा प्रभाव झाला तर लसीची आवश्यकता आहे. पुढील काही महिने आपल्याला या बाबी तपासाव्या लागतील, असं देखील डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, लसींच्या तुटवड्यामुळे महाराष्ट्रात 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींचं लसीकरण तात्पुरतं स्थगित करण्यात आलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची बदली रद्द; मॅटकडून मोठा निर्णय

राष्ट्रवादीच्या आमदारावरील गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट, आमदारच संशयाच्या फेऱ्यात?

शेवटच्या घटका मोजणाऱ्या आईसाठी त्यानं गायलं गाणं, डॅाक्टरलाही रडू कोसळलं

‘…तर हे दिवस आपल्याला पाहायला मिळाले नसते’; बच्चू कडू पंतप्रधान मोदींवर कडाडले

लॉकडाऊनला कंटाळून सलून व्यावसायिकाची आत्महत्या; ‘या’ शहरातील धक्कादायक घटना

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More