बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात मध्यरात्री काळजाचा थरकाप उडवणारा थरार, 10 जणांच्या टोळक्याकडून सपासप वार!

पुणे | बिबवेवाडीत मध्यरात्री सराईत गुन्हेगाराचा टोळक्याने सपासप वार करत खून केल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. मात्र, शहरात दिवसभर कडक लॉकडाऊनची कारवाई सुरू असताना मध्यरात्री टोळक्याचा धुडगूस सुरूच असल्याचे दिसत आहे. माधव हनुमंत वाघाटे असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात 10 जणांच्या टोळक्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधव हा सहकारनगर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. मध्यरात्री माधव याचा मित्र सुनील खाटपे याने फोनकरून माझे भांडण झाले आहे. मी बिबवेवाडी येथील ओटा स्कीमजवळ असल्याची माहिती दिली. त्यामुळे माधव आणि यातील फिर्यादी सिद्धार्थ पालांगे हे दोघे दीड वाजण्याच्या सुमारास तेथे आले.

चौकात सुनील याची वाट पाहत असताना अचानक दहा जणांचे टोळके हातात लोखंडी रॉड, बांबू व ट्यूब लाईट सारखे हत्यारे घेऊन आले. त्यांनी माधव याला शिवीगाळ करत त्याच्या तोंडावर आणि डोक्यात बेदम मारहाण करून त्याचा खून केला. त्यानंतर हे टोळके पसार झाले आहे.

दरम्यान, नेमका हा खून का झाला हे समजू शकलेले नाही. मात्र, फक्त मित्राच्या सांगण्यावरून तो गेल्यानंतर हा प्रकार घडला आहे. तो मित्र देखील पसार आहे.

थोडक्यात बातम्या – 

कोरोनामुळे ‘या’ तालुक्यातील दोन कुटुंबे उद्ध्वस्त, आठ दिवसांत पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू

कोरोनातून बरे झाल्यानंतर तुम्हाला ‘ही’ लक्षणे असतील तर अजिबात दुर्लक्ष करू नका

“पृथ्वीकडे ती क्षमता जी सेहवागकडे होती, त्याचा इंग्लंड दौऱ्यात समावेश का नाही?”

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आकडेवारी दिलासादायक, पण मृतांचा आकडा वाढला

बॉलीवूडमधील एका बड्या सेलिब्रिटीच्या घराजवळ तरूणीवर सामूहिक बलात्कार; तिघांना अटक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More