महाराष्ट्र मुंबई

लग्नासाठी जाणाऱ्या कारचा टायर फुटून भीषण अपघात!

मुंबई | मुंबईहून गुजरातकडे लग्नासाठी जाणाऱ्या इको कारच्या मागचा टायर फुटून तोल गेल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.

मुंबईतील माहिम परिसरात राहणारे शेख कुटुंब गुजरात वापी या ठिकाणी लग्नासाठी जात होते. त्यावेळी अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धानीवरीजवळील सूसरी नदीच्या पुलावर इको कारचा टायर फुटला. यानंतर गाडीचा तोल गेल्याने गाडी पलटी झाली. दुपारी 2 च्या सुमारास ही घटना घडली.

हा अपघात इतका भीषण होता की यात गाडीचा चक्काचूर झाला. या अपघातात आईसह एका वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. या गाडीत लहान मुलांसह 10 जण होते.

दरम्यान, यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

थोडक्यात बातम्या-

ममता बॅनर्जी यांनी मोदींच्यासमोरच ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणाऱ्यांना झापलं

‘आजचा दिवस हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण’; पुतळ्याच्या अनावरणानंतर उद्धव ठाकरे भावूक

बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं थाटात लोकार्पण

मुंबईत दिग्गजांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरेंच्या हस्ते बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण!

“शशिकांत शिंदेंचा शंभर कोटींचा दावा हा सर्वात मोठा राजकीय विनोद”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या