एका खेळण्यानं उडवली आज्जीची तारांबळ, हसून हसून पोट दुखेल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | एक खेळणी मुलांमध्ये खूप लोकप्रिय आहे. त्याचे नाव डान्सिंग-टॉकिंग कॅक्टस टॉय आहे. हे खेळणं नाचतं, गातं आणि समोरच्या व्यक्तीने बोललेल्या शब्दांची पुनरावृत्ती देखील करतं. याचा अर्थ हे एक बहु-कौशल्य खेळणी आहे जे मुलांना व्यस्त आणि आनंदी ठेवते.

सोशल मीडियावर एक इन्स्टाग्राम रील व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक वृद्ध महिला घाबरून खेळण्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

आज्जीचा हा व्हिडीओ _akshay_rider_08 या इंस्टाग्राम यूजरने 14 नोव्हेंबर रोजी शेअर केला होता, ज्याला ही बातमी लिहिपर्यंत जवळपास 1 कोटी व्ह्यूज आणि 5 लाख 14 हजार लाईक्स मिळाले आहेत.

या क्लिपमध्ये आपण पाहू शकतो की वृद्ध महिला खुर्चीवर बसलेली आहे आणि तिच्या हातात ‘डान्सिंग कॅक्टस’ खेळणी आहे. कॅक्टसने तिच्या शब्दांची पुनरावृत्ती केल्याने ती थक्क झाली.

ती एक-दोन वेळा काहीतरी बडबडते आणि शेवटी घाबरून ते व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीकडे देते. आजीची ही घाबरलेली प्रतिक्रिया पाहून लोक हसत आहेत.

हा व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येतोय.

महत्त्वाच्या बातम्या-