बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; दुचाकी दुभाजकावर आदळल्याने दोघांचा मृत्यू

पुणे | मुंबई-पुणे महामार्गावर पुण्याहून मुंबईकडे जाताना आकुर्डी येथे भरधाव वेगात आलेली दुचाकी दुभाजकावर थेट धडकली आहे. या अपघातात दुचाकीवर स्वार असलेल्या आर्यन परमार आणि श्वेता गजबे यांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन दुचाकीस्वार तरुणी जखमी झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात आकुर्डी येते झाला. अपघात झालेल्या दुचाकीवर एक तरुण आणि तरुणी प्रवास करत होते. ही दुचाकी भरधाव वेगात जात होती. यावेळी नियंत्रण सुटल्यामुळे दोघेही रस्त्याच्या दुभाजकावर थेट आदळले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या अपघातात दुसऱ्या दुचाकीवरून जाणाऱ्या दोन तरुणीही जखमी झालेल्या आहेत.

यातच त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये दुचाकीनेही थेट पेट घेतला. आर्यन परमार आणि श्वेता गजबे असं मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.

दरम्यान, नाशिकमध्येही अंगाचा थरकाप उडवणारा एक झाला आहे. दसऱ्याच्या दिवशी मुलीला सासरी भेटून परतणाऱ्या वडिलांचा कारने दिलेल्या धडकेमध्ये जागीच मृत्यू झाला होता. रंगनाथ खालकर असे मृताचे नाव होते, तर त्यांच्या गंभीर जखमी मेहुण्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. हिंगणवेढे परिसरात 15 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली होती.

थोडक्यात बातम्या-

‘…तर शहरात पाय ठेवणार नाही’; अमोल कोल्हेंनी भाजपला दिलं चॅलेंज

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

भाजपचं टेन्शन वाढलं! उत्तर प्रदेशात प्रियंका गांधी काँग्रेसचा चेहरा

शाकिबची दमदार कामगिरी! मलिंगाला मागे टाकत केला ‘हा’ नवा विक्रम

युवराज सिंगला हरियाणात अटक! ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यामुळे 3 तास कसून चौकशी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More