बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘युनिव्हर्सल बाॅस’ ख्रिस गेल म्हणतोय! “मला पाकिस्तानात जायचंय, माझ्यासोबत कोण कोण येतंय?”

मुंबई | आयपीएलच्या उर्वरीत सामन्यांचा थरार आजपासून यूएईत होत आहेत. आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज या दोन्ही संघामध्ये सामना सुरू आहे. अशातच आता क्रिकेटचा युनिव्हर्सल बाॅस अशी ओळख असलेला वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने केलेल्या एका ट्विट  केलं आहे. त्याच्या या ट्विटने सगळ्यांनाच आश्चर्यांचा धक्का बसला आहे.

आयपीएलमध्ये ख्रिस गेल सध्या पंजाब संघाकडून खेळत आहे. सुरक्षेचं कारण देत न्युझीलंड संघाने ऐनवेळी पाकिस्तान दौऱ्यावरून माघारी घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यावरूनच मी उद्या पाकिस्तानला जातोय. तर माझ्यासोबत कोण कोण येतंय? असं ट्विट ख्रिस गेलने केलं आहे. त्यामुळे गेलने थेट न्यझीलंड संघावर निशाणा साधल्याचं दिसून येत आहे.

ख्रिस गेलने केलेल्या या ट्विटवर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरने गेलचा मात्तब्बर खेळाडू असा उल्लेख करत त्याला निमंत्रित दिलं आहे. गेलच्या या ट्विटवर अनेक नेटकऱ्यांनी देखील भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, युनिव्हर्सल बाॅस तुझ्यासाठी आयपीएल नाही आहे, अशा प्रकारच्याही कमेंट्स आल्या आहेत. तसेच गेल खरचं पाकिस्तानला जाणार आहे का याबाबतची कोणतीही स्पष्टता नाही. गेल हा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय राहतो. तसेच तो अशा प्रकाराच्या मजेशीर गोष्टी ही करत असतो. त्यामुळे गेलने केलेल्या हे ट्विट फक्त मनोरंजनासाठी होतं, असं दिसून येतंय.

पाहा ट्विट-

 

थोडक्यात बातम्या-

‘…अन्यथा किरीट सोमय्यांना जन्माची अद्दल घडेल’; हसन मुश्रीफांचा पलटवार

‘किरीट सोमय्या आंतकवादी आहेत का?’; चंद्रकांत पाटलांचा संतप्त सवाल

मोठी बातमी! कायरन पोलार्ड करणार मुंबईचं नेतृत्व; रोहित, हार्दिक संघाबाहेर

इवेन्ट ख़त्म! 17 सप्टेंबरच्या लसीकरणावरून राहुल गांधींचा मोदी सरकारला टोला

पंजाबच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; चरणजीत सिंह चन्नी नवे मुख्यमंत्री

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More