बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“स्वतःला वाघ म्हणवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पवारांच्या ताटाखालचे मांजर झालेत”

मुंबई | काही दिवसांपुर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला धारेवर धरलं होतं आणि अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. फक्त सभागृहातच नाही तर आता सोशल मीडियावर देखील भाजप विरूद्ध सरकार अशी लढाई होताना दिसत आहे.

भाजपच्या अधिकृत ट्विटर हँटलद्वारे एक ट्विट करण्यात आलं आहे. केवळ खुर्चीच्या लालसेपोटी स्वतःला वाघ म्हणवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पवारांच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत. सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांना वेगवेगळा न्याय आणि नियम आहे का? ज्याच्यावर आरोप झालेत त्यांनी राजीनामा द्यायलाच हवा, असं ट्विट भाजपने केलं आहे.

भाजपने ट्विटनंतर #ResignanilDeshmukh असं हॅशटाॅग देखील दिला आहे. आपल्या पक्षाच्या धनंजय मुंडे आणि अनिल देशमुख यांचा शरद पवारांनी बचाव केला पण संजय राठोर यांचा राजीनामा घेण्यात आला. राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना वेगवेगळे नियम आहेत का? असा प्रश्न देखील या ट्विटमधून विचारण्यात आला आहे.

दरम्यान, भाजप आता सरकारची सर्व प्रकरणे उकरून काढण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर टीका करण्यात येत आहे. तर फडणवीस आणि इतर नेते देखील सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहे.

थोडक्यात बातम्या-

शरद पवारांना चुकीची माहिती देण्यात आली; फडणवीसांनी दाखवला पुरावा!

फडणवीसांचा ठाकरे सरकारवर ‘डेटा बाॅम्ब’; पत्रकार परिषदेत केला मोठा खुलासा

अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या, ‘हा’ महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता

‘मला पवारांसारखं इंग्रजी येत नाही’; देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला

‘धन्यवाद मोदी सरकार’, राष्ट्रवादीकडून पुण्यात बॅनरबाजी; वाचा काय आहे प्रकरण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More