बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बेघर लाभार्थ्यांना जागा ताब्यात मिळवुन देण्यासाठी जमिनीत अर्ध दफन होऊन अनोखं आंदोलन

सोलापूर | सोलापूर जिल्ह्यातील अकलूज ग्रामपंचायत हद्दीतील बेघर नागरिकांना 2004 साली मंजूर झालेल्या जागा मिळाव्यात, यासाठी महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेनं अनोखं आंदोलन केलं आहे. अकलूजमध्ये झालेल्या अनोख्या आंदोलनाची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

दरम्यान, 2004 साली अकलुज ग्रामपंचायत हद्दीतील बेघर नागरिकांना जागा मंजूर करण्यात आल्या होत्या. परंतु, या जागेच्या मिळकतीसाठी नागरिकांकडून ग्रामपंचायत व महसूल विभागाने 11 हजार रुपये घेतले. तसेच लाभार्थी हे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतानाही त्यांनी 11 हजार रुपये शासन दरबारी भरले.

चालू सातबारा दप्तरी 514 लाभधारकांची नोंद झाली असून अनेक वेळा पाठपुरावा करून देखील लाभार्थ्यांना प्रशासनातर्फे जागा ताब्यात देण्यात आली नसल्याने ही जागा ताबडतोब लाभधारकांना ताब्यात द्यावी, यासाठी अर्ध दफन होऊन आंदोलन करण्यात आलं. यावेळी भर पावसात महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जमिनीत अर्ध दफन होऊन आंदोलन केलं.

दरम्यान, यासंबंधी तहसीलदारांनी आंदोलनस्थळी चर्चा करून 15 दिवसांमध्ये संबंधित विभागाची बैठक घेऊन नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. तसेच हे आंदोलन स्थगित करून प्रशासनाला सहकार्य करण्याचंही आवाहन करण्यात आलं. तसेच यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं.

थोडक्यात बातम्या –

“सोनिया सेनेचे अध्यक्ष नाव महाराजांचं घेतात, काम मात्र औरंगजेबाचं करतात”

‘येत्या निवडणुकांमध्ये शिवसेनेसोबत युती करणार का?’; अजित पवार म्हणाले…

शिवप्रसाद काय असतो, ते राऊतांनी वैभव नाईकांना विचारावं- नितेश राणे

सीबीएसई बोर्डाच्या मार्किंग पद्धतीला विद्यार्थ्यांचा विरोध, सर्वोच्च न्यायालयात दिलं आव्हान

जुन्या आठवणींना उजाळा! ‘हा’ फोटो शेअर करत जयंत पाटीलांनी शिवसेनेला दिल्या शुभेच्छा, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More