बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘प्लॅस्टिक बॉटल द्या, मोफत वडापाव खा’; ‘या’ ठिकाणी राबवला जातोय अनोखा उपक्रम

पुणे | प्लॅस्टिकमुक्त शहरासाठी पिपंरी- चिंचवड महापालिकेने एक अनोखा उपक्रम राबवला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने ‘प्लॅस्टिक बॉटल द्या आणि मोफत चहा वडापाव खा’ या उपक्रमाची घोषणा केली आहे. या उपक्रमात वडापाव विक्रेत्यांना सहभागी करून घेण्यासाठी महापालिकेने वृत्तपत्रात जाहिरातही दिली आहे.

महापालिकेच्या या उपक्रमातंर्गत नागरिकांना काही ठराविक ठिकाणी या उपक्रमाचा लाभ घेता येणार आहे. यासाठी नागरिकांना त्यांच्याकडील प्लॅस्टिक बॉटल वडापाव विक्रेत्यांकडे जमा करायच्या आहेत. त्यानंतर ते वडापाव विक्रेते नागरिकांना मोफत वडापाव आणि चहा देणार आहेत. या उपक्रमामुळे प्लॅस्टिकमुक्त शहर करण्यास मदत मिळणार आहे.

वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीनुसार 5 बॉटल दिल्यास 1 चहा आणि 10 बॉटल दिल्यास 1 वडापाव ग्राहकांना मिळणार आहे. या वडापाव विक्रेत्यांना पिंपरी- चिंचवड महानगरपालिका या मोफत वडापावची रक्कम पुरवणार आहे. वडापाव विक्रेत्यांच्या मदतीने महानगरपालिका प्लॅस्टिकमुक्त शहर करण्याचा प्रयत्न करणार आहे.

दरम्यान, महापालिकेने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. देशातील सर्वच शहरांनी हा उपक्रम राबविण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रियाही सोशल मीडियावर उमटत आहेत. महानगरपालिकेने वृत्तपत्रातील जाहिरातीतून वडापाव आणि चहा विक्रेत्यांना या योजनेत सहभागी होण्याचं अवाहन केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘माई, तुझ्या प्रेमाला…’, गुगलनं अनोख्या पद्धतीनं वाहिली श्रद्धांजली

“मोदीजी, भारतात असुरक्षित वाटत असेल तर पाकिस्तानात जा”

महत्त्वाची बातमी! ‘या’ कारणामुळे आजपासून काही दिवस CNG राहणार बंद

लहान मुलांमध्ये ओमिक्रॉनची ‘ही’ लक्षणं आढळल्यावर वेळीच व्हा सावध!

‘दुसऱ्या लाटेच्या तुलनेत सध्या…,’ निती आयोगाचा गंभीर इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More