बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनापासून बचाव करण्यासाठी युवकाचा अनोखा जुगाड, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत या लाटेत अधिक संकटांचा सामना करावा लागत आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे रुग्णसंख्येत दिवसेंदिवस कमालीची वाढ झालेली पाहायला मिळत आहे. याशिवाय ब्लॅक फंगस संक्रमण म्हणजेच म्यूकोरमायकोसिसचा धोकासुद्धा वाढत आहे. अशा स्थितीत तज्ज्ञांनी अधिक सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

सध्या कोरोनाच्या परिस्थितीत काळजी घेण्यासाठी अनेक वेगवेगळे नुस्के वापरले जात असलेले पाहायला मिळतात. कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळे जुगाड सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले पहायला मिळतात. अशातच आणखी एक जुगाडू व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी शेअर केला आहे. व्हिडीओसोबत त्यांनी मजेशीर कॅप्शनही लिहिलं आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन व्यक्ती बाईकवर एकमेकांपासून बरंच अंतर ठेवून बसले आहेत. आणि त्यांनी आपली बाईक प्लास्टिकने कव्हर केली आहे. या व्हिडीओमध्ये या व्यक्तींनी जुगाड टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर आपल्याला रोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात. अशा व्हिडीओला प्रेक्षकांकडून भरपूर पसंती मिळत असते.

पाहा व्हिडीओ –

थोडक्यात बातम्या – 

आईचा कोरोनाने मृत्यू; बातमी कळताच मनाला सावरत स्वत:च्या कामाची जबाबदारी अगोदर पूर्ण केली

शरीरसंबंध ठेवण्यास पत्नीने दिला नकार, पतीने पत्नीवर गोळ्या झाडून त्यानंतर केला ‘हा’ धक्कादायक प्रकार

“लाॅकडाऊन आपल्याला हळुहळु उघडावा लागेल, लगेचच सर्व काही उघडणार नाही”

बापरे! मानवी वस्तीमध्ये आला ‘हा’ भला मोठा प्राणी…, पाहा व्हिडीओ

लग्नात मंत्र म्हणता म्हणता ब्राह्मण दमला; रिकाम्यावेळात नवरा-नवरीने केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More