बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लॉकडाऊनमध्ये दारू विकण्यासाठी केला अनोखा जुगाड, पाहा व्हिडीओ

लखनऊ | गेल्या वर्षभरापासून कोरोनाने सगळीकडे थैमान घातलं आहे. सध्या सगळीकडे कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सरकारने लॉकडाऊन लागू केलं आहे.

अनेक ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता अनेक उद्योग-धंदे बंद आहेत. त्यामध्ये दारू विक्रीही बंद आहे. एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन करून दारू विक्रीसाठी एक अनोखा जुगाड करण्यात आला आहे.

व्हिडीओमध्ये एका भिंतीमधून दारूच्या बाटल्या बाहेर येत असल्याचं दिसून येत आहे. लॉकडाऊन असल्यामुळे डायरेक्ट दारू विक्री करता येत नसल्यानं भिंतीला एका ठिकाणी एक सापट तयार केली आहे. तिथून एक व्यक्ती दारूच्या काही बाटल्या काढत आहे. त्यानंतर आणखी एक व्यक्ती त्या सापटीपाशी येतो. सुरूवातीला एक बॉटल हातात घेतो. त्यानंतर तो आपल्या हातातील एक चिठ्ठी त्या सापटीमधून आत कोणाला तरी देत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

ही घटना उत्तर प्रदेशमधील रायबरेलीतील असून ग्राहकांकडून विदेशी मद्यापानासाठी 20 ते 100 रूपये अधिक आकारले जात असल्याचं समोर आलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

राज्यातील लॉकडाऊन वाढवण्यासंदर्भात राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले….

आई-वडिलांचा नकार जिव्हारी लागला; 16 वर्षीय तरुणीची नदीत उडी घेत आत्महत्या

‘अ‍ॅलोपॅथी डॉक्टर राक्षसांपेक्षाही वाईट’; भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

मायावती यांच्यावर केलेल्या अश्लिल वक्तव्यानं रणदीप हुड्डा अडचणीत; पाहा व्हिडीओ

कोरोनावर प्रभावी असलेलं हे औषध आता भारतातही वापरणार; आठवड्याभरात रुग्ण होऊ शकतो बरा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More