नरेंद्र मोदींची अतिशय जवळची व्यक्ती रूग्णालयात दाखल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींचे(Narendra Modi) भाऊ प्रल्हाद मोदी(Pralhad Modi) हे रस्ता अपघातात जखमी झाल्याची माहिती मंगळवारी समोर आली होती. त्यातच आता मोंदींच्या आणखी एका जवळच्या व्यक्तीला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मोदींच्या मोतोश्री हीराबेन मोदी(Heeraben Modi) यांची प्रकृतीत अचानक बिघाड झाल्यानं त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर अहमदाबादच्या यूएन मेहता रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

यूएन रूग्णालयाकडून एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. या निवेदनात मोदींच्या मातोश्रींना रूग्णालयात दाखल केल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, मोदींनी त्यांच्या मोतोश्रींचा जूनमध्ये 100 वा वाढदिवस साजरा केला होता. या निमित्तानं मोदींनी त्यांचे पाय धुवून आशीर्वाद घेतला होता. तसेच त्यांच्याबद्दल सोशल मीडियावर एक भावनिक पोस्टही लिहिली होती.

महत्वाच्या बातम्या-