महेश भट्ट यांच्या प्रकृतीबाबत अत्यंत महत्वाची अपेडट समोर!

मुंबई | बाॅलिवूडच्या(Bollywood) टाॅप दिग्दर्शकांच्या यादीत महेश भट्ट(Mahesh Bhatt) यांचं नाव आहे. महेश भट्ट यांनी आजपर्यंत अनेक उत्तम चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यामुळं त्यांना फाॅलो करणाारे असंख्य चाहते आहेत.

पण नुकतीच महेश भट्ट यांच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. भट्ट यांच्या ऋदयाची नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळं भट्ट कुटुंबही चिंतेत आहे.

गेल्या महिन्यात त्यांच्या ऋदयाची तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी डाॅक्टरांनी शस्रक्रियेची आवश्यकता असल्याचे सांगितले होते. त्यामुळं आता त्यांची अॅंजिओप्लास्टी करण्यात आली आहे.

महेश भट्ट यांचा मुलगा राहुल त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना म्हटला की, ते आता ठिक आहेत आणि घरी परतले आहेत. यावरून सध्या महेश भट्ट यांची प्रकृती स्थिर आहे, असं दिसून येत आहे.

दरम्यान, महेश भट्ट यांनी वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी दिग्दर्शक म्हणून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘मंजीले और भी है’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट आहे.

‘सारांश’ हा महेश भट्ट यांचा सर्वात लोकप्रिय ठरलेला चित्रपट आहे. सध्या महेश भट्ट यांचे प्रोडक्शन हाऊसदेखील आहे. तसेच त्यांचे आगामी काळात काही चित्रपटही येणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-