महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबाबत अत्यंत महत्वाची अपडेट समोर

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद(Maharashtra-Karnataka Border Dispute) चांगलाच चर्चेत आहे. या सीमा वादावरून राज्यात सत्ताधारी(Goverment) आणि विरोधक एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत.

त्यातच आता महाराष्ट्र-कर्नाटक सीमापवादाबाबत अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे. ज्यावरून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखी पेटण्याची शक्यता असल्याचं दिसत आहे.

हा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरू असून जे काही होईल ते तिथंच होईल, असं कर्नाटक सरकारकडू सांगण्याच येत आहे. मात्र कर्नाटक विधानसभेत या सीमा प्रश्नावर महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्राला एक इंचही जागा न देण्याचा ठराव कर्नाटकच्या निधानसभेत मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती समोर आली आहे.

कर्नाटक विधानसभेत हा ठराव मंजूर झाल्यानंतर महाराष्ट्र सरकार(State Goverment) यावर काय भूमिका घेणार किंवा काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-