कोरोनाबाबत अत्यंत महत्वाची अपडेट समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | गेल्या दोन वर्षांपूर्वी कोरोनानं(Corona Virus) जगभर हाहाकार माजवला होता. त्यावेळी भारतातील परिस्थीतीही भयंकर झाली होती. परंतु गेल्या काही महिन्यांत कोरोनाचा फैलाव कमी झाल्याचे दिसत होते. पण आता पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलं आहे.

चीनमध्ये सध्या कोरोनाचे रूग्ण(Corona Patients) दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याचपाठोपाठ आता भारतातही कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र दिसत आहेत.

गेल्या दोन दिवसांत बिहारमध्ये बाहेर देशातून आलेल्या चार जणांचा कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आला. यानंतर देशभर चिंता व्यक्त केली जात आहे.

त्यातच आता देशातील कोरोना रूग्णांच्या टक्केवारीतही वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या आठवड्यात म्हणजेच दिनांक 19 ते 25 डिसेंबर दरम्यान कोरोना रूग्णांची संख्या 11 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळं सर्वांनी सतर्क राहणं गरजेचं आहे.

सध्या महाराष्ट्रासह पंजाब, दिल्ली, राजस्थान, हिमाचल प्रदेश, तेलंगणा आणि ओडिशा या राज्यांत कोरोना रूग्णांचे प्रमाण वाढत आहे.

दरम्यान, भारत सरकारनं(Central Goverment) जी कोरोनाची नियमावली जाहीर केली आहे, त्या नियमांचे पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणंही तितकच आवश्यक आहे.

महत्वाच्या बातम्या-