“स्तनांचा आकार वाढवण्यासाठी…”; प्रसिद्ध अभिनेत्रीचा अत्यंत धक्कादायक खुलासा

Entertainment News | अभिनेत्री समीरा रेड्डी हिने नुकतीच एक मुलाखत दिली. यामध्ये समीराने तिचे बॉलिवूडमधील अनेक किस्से सांगितले. समीरा रेड्डीने यावेळी बोलताना अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे.

स्तन मोठे करून घेण्यासाठी तिच्यावर सर्जरी करण्यासाठी दबाव टाकण्यात आलाचा धक्कादायक दावा समीराने केलाय. माझ्या करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना मी सर्जरी करून माझे स्तन मोठे करून घ्यावे, यासाठी माझ्यावर किती दबाव टाकला गेला हे मी सांगू शकत नाही, असं समीरा रेड्डीने सांगितलं.

समीरा रेड्डीचा धक्कादायक खुलासा

समीरा, सगळं करत आहेत, मग तू का नाही?. पण मला माझ्या आत असं काही नको होतं. हे आपले असे दोष लपवण्यासारखं झालं जे मुळात दोष नाहीच. ज्यांना प्लास्टिक सर्जरी आणि बोटॉक्स करायचं आहे त्यांना मी नावं ठेवणार नाही, पण मी ते करणार नाही, असं ती म्हणाली.

लोक म्हणतात की मी आता अधिक आनंदी आणि अधिक कंफर्टेबल दिसत आहे. मी 28 वर्षांची असताना सुंदर दिसत होते, पण 45 व्या वर्षी एक कंफर्ट आला आहे. मी 40 वर्षांची असताना इंटरनेट माझं वय 38 वर्षे दाखवत होतं. पण मला 40 वर्षांची असल्याचा अभिमान होता, असंही ती म्हणाली.

Entertainment News | “मी माझं वाढलेलं वजन दाखवेन”

मी म्हणाले की मी माझी त्वचा खराब असेल तर मी ती तशीच दाखवेन, मी माझं वाढलेलं वजन दाखवेन. कारण हीच मी आहे. 36-24-36 या बॉडी साइजमध्ये फिट होण्याचा प्रयत्न करण्याऐवजी मी जे केलं, त्याबद्दल जास्त आनंदी आहे, असंही समीरा म्हणाली.

45 वर्षांची झाल्यावरही माझ्याकडे चांगलं दिसण्याची क्षमता आहे. तुमचे पांढरे केस, तुमची पोटाची चरबी आणि तुमचे स्ट्रेच मार्क्स दाखवता तेव्हा तिथल्या कोणाला तरी ‘माझ्यासारखंही दुसरं कोणीतरी आहे असं वाटतं आणि यामुळे त्यांच्यावरील दबाव दूर होतो, असंही समीरा म्हणालीये.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sameera Reddy (@reddysameera)

महत्त्वाच्या बातम्या- 

अभिनेत्रीने वयाच्या 37 व्या वर्षी संपवलं आयुष्य, पोलिसांना वेगळाच संशय!

“बारामतीत एकच दादा अजित दादा, दुसरा कोणी दादा होणार नाही”

काल शपथ घेतली, आज खासदार म्हणतोय ‘मला मंत्री व्हायचं नाही’

बॉलिवूडमध्ये खळबळ! ‘या’ अभिनेत्रीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला

मोदींनी पंतप्रधानपदाचा स्विकार करताच शेतकऱ्यांसाठी उचललं मोठं पाऊल!