बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माझ्यासाठी आणि समाजासाठी अतिशय दुर्दैवी आणि अतिशय भयानक क्षण- विनोद पाटील

औरंगाबाद | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द ठरवलं आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारला खूप मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर मराठा आरक्षण लढ्यातील याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

मागच्या वर्षी न्यायालयाने स्पष्ट केले होते, स्थगितीचा संबंध नाही. अंतिम निकाल देऊ. याचवेळी प्रकरण वर्ग करणे गरजेचे होते. सरकारची आरक्षण देण्याची इच्छा नव्हती, असे मी म्हणणार नाही. पण सरकार कडे काही युक्ती देखील नव्हती, असं विनोद पाटील म्हणाले.

माझ्यासाठी आणि समाजासाठी अतिशय दुर्दैवी क्षण आणि अतिशय भयानक क्षण आहे. सुप्रीम कोर्टाने आम्ही एकत्ररित्या निर्णय देत असल्याचं स्पष्ट केलं आहे. मुबंई हायकोर्टाने दिलेला निर्णय आणि मागास आयोगाचा रिपोर्ट याच्यातून आम्हाला मराठा आरक्षण देणं गरजेचं आहे हे स्पष्ट होत नाही. तसंच इंद्रा सहानी खटल्याबाबत पुन्हा एकदा तपासणी करण्याची गरज आम्हाला वाटत नाही यामुळे मराठा आरक्षण आम्ही रद्द करतोय असं स्पष्ट मत सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे. या दुर्दैवी निर्णयामुळे महाराष्ट्रात स्थगित असलेलं मराठा आरक्षण थांबलं आहे, असं विनोद पाटील म्हणाले.

आहे. मराठा तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त झालं आहे आणि याची जबाबदारी राज्य सरकारनं घ्यावी. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात बोलायचं नाही, पण हा निर्णय दुर्दैवी आहे. याचा परिणाम संपूर्ण तरुण पिढीवर होणार आहे. सविस्तर ऑर्डर आल्यानंतर वकिलांशी चर्चा करुन समाजाच्या, तरुणांच्या वतीने पुढील निर्णय घेतला जाईल, असं विनोद पाटील यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या

पुण्याला मिळाला लसींचा मोठा साठा; उद्यापासून सुरू होणार 45 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण

पोलिसांना माणुसकी आली अंगलट; रोजा सोडण्यासाठी आरोपीला सोडलं अन्…

“या महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाचा नियोजित पद्धतीने खून केला”

“मराठा आरक्षणाला राज्य सरकारचा निष्काळजीपणा कारणीभूत”

“पंतप्रधान कार्यालय निरुपयोगी, कोरोना लढ्याची जबाबदारी गडकरींकडे सोपवा”   

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More