‘लोकशाहीमुळं मी भांडू शकतो’, चिमुरड्याच्या भाषणाचा ‘तो’ काॅमेडी व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

मुंबई | नुकताच प्रजासत्ताक दिन (Republic Day) पार पडला. प्रजासत्ताक दिन म्हणजे शाळेतील मुलांसाठी एका प्रकारचा सणच असतो. अनेकदा यादिवशी शाळेत परेड, भाषण यांसारख्ये कार्यक्रम होतात. त्यातच यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनादिवशीचा एका लहान मुलाचा भाषणाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे

प्रजासत्ताक दिनादिवशी शाळेत लहान मुलांना प्रजासत्ताक दिनाचं भाषण करायला लावलं जात. असंच एका लहान चिमुकल्यानं केलेलं भाषण सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहताच अनेकांना हसू आवरेनासे झाले आहे. प्रजासत्ताक दिनादिवशी लोकशाही सुरु झाली असल्याचं सांगत त्या मुलानं भाषणास सुरुवात केली असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.

आज लोकशाही (Democracy) दिन आहे. आजच्या दिवसापासून देशात लोकशाही सुरु झाली. या लोकशाहीमध्ये तुम्ही काहीदेखील करु शकता. भांडू शकता, दोस्ती करु शकता. पण मला तर मोक्कार धिंगाणा आणि खोड्या करायला, माकडासारखे झाडावर चढायला खूप आवडतं. अशा बोबड्या बोलानं त्यानं भाषणाची सुरुवात केली आहे.

मी असं केलं की बाबा मला मारत नाहीत कारण ते लोकशाही मानतात. गावातील पोरं माझं नाव संराना सांगतात. जशी लोकशाहीची मूल्ये आतंकवादी(Terrorist) पायदळी तुडवतात तसं सर मला मग पायदळी तुडवतात. तुझं वागणं लोकशाहीला धरुन नाही असं म्हणातात आणि मला कोंबडा बनवतात. लोकशाहीचं असं वर्णन त्यानं केलं आहे.

खर सांगतो माझ्यासारखा गरीब मुलगा तालुक्यात शोधून सापडणार नाही, एवढं बोलून मी माझे अनमोल विचार थांबवतो, असं म्हणत त्या चिमुकल्यानं त्याच्या भाषणाचा शेवट केला आहे. हा व्हिडीओ एका अकाऊंटवरुन ट्विट करण्यात आला आहे. व्हिडीओत दिसणारा विद्यार्थी किंवा शाळा कोणती हे अद्याप समोर आलेलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More