‘देवेंद्र फडणवीस जास्त बोलाल तर…’; केंद्रातील भाजपच्या बड्या नेत्याचा इशारा

पंढरपूर | पंढरपूरमधील (Pandharpur) विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकार (Goverment) मुक्त करण्यावर चर्चेसाठी भाजपचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी पंढरपूरमध्ये आले होते. यावेळी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर (Modi Goverment) टीकास्त्र सोडलंय.

मी म्हणतोय, हा विकास प्रकल्प होणार नाही. फडणवीस जास्त बोलतील तर ते उपमुख्यमंत्रीही राहणार नाहीत. एवढी घाई कशासाठी आहे, असं सुब्रमण्यम स्वामी (Subramanyam Swami) म्हणालेत.

विकास करायचाच असेल तर इथली चंद्रभागा नदी शुद्ध करा, इथे विमानतळ बांधा, एवढे लोक मंदिरात दर्शनासाठी येतात. मंदिर परिसराचा विकास करा. या कॉरिडोरवरून कुणा-कुणाला नोटीसा पाठवणं हे चालणार नाही, असा इशारा सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे.

भाजपाचे मोदी सरकार देशातील मंदिरं स्वतःच्या अधिपत्याखाली घेत आहे, असा आरोप सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. उत्तराखंडमधील अनेक मंदिरांचं सरकारीकरण झालं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, पंढरपूर मंदिर सरकार मुक्त करण्यासाठी जानेवारीत जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More