बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रत्नागिरीत आढळला पांढरा कावळा, पाहा व्हिडीओ

रत्नागिरी | काळा म्हटलं की कावळा, असं लहानपणी शाळेत शिकवलं जातं. कावळ्याची ओळखच त्याच्या रंगावरून होते. त्यामुळेच कदाचित त्याचं नाव कावळा असं ठेवलं असावं. पण जर कावळा काळाच नसेल तर, त्याला काय म्हणणार? अशीच चिंता आता रत्नागिरीच्या लोकांना सतावत आहे. पांढऱ्या कावळ्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

काळबादेवी परिसरात शेखर शेट्ये नावाचे गृहस्त राहतात. त्यांच्या घराजवळ परिसरातील अनेक पक्षी झाडांवर आढळतात. चार दिवसांपूर्वी शेट्ये घराच्या बाजूला असलेल्या कोंबड्यांना खाणं घालत असताना काही कावळे तिथे आले. त्यात त्यांना एक पांढरा पक्षी दिसला. प्रथम दर्शनीत तो पक्षी कबुतर असावा असं त्यांना वाटलं. मात्र थोडे कुतूहलानं त्यांनी त्या पक्षाचं निरीक्षण केल्यानंतर तो कावळाच आहे असं त्यांच्या लक्षात आलं.

थोड्यावेळाने त्यांनी त्या पक्षाचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो कावळा असल्याचं सिद्ध झालं. त्यानंतर त्यांनी त्याचा एक व्हिडीओ काढला. कावळे कधी दुसऱ्या गटातील कावळ्यांना सोबत अन्न खाऊ देत नाही, परंतू हा कावळा दुसऱ्या कावळ्यांसोबत अन्न खात होता. त्यामुळे हा स्थानिक टोळीतील असावा असं शेखर शेट्ये यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, नवीन प्रजाती नसून अनुवंशिक स्थितीमुळे होणारे एक उत्परीवर्तन आहे. पक्षी, प्राणी आणि कीटक यांच्या शरीराचे रंग विशिष्ट द्रव्यांमुळे ठरतात. हा अनुवंशिक बदल आहे. रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे पूर्ण पांढऱ्या रंगाची पिसे दिसून येतात आणि डोळ्यातील रंगद्रव्य नसल्यानं आतील लाल रंगाच्या केशिकांचाही रंग डोळ्यांना येऊन ते लालसर दिसतात, असं पक्षीतज्ज्ञ प्रतीक मोरे यांनी सांगितलं आहे.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

बीएमसीने काढलेल्या ‘या’ ग्लोबल टेंडरला एकूण 8 कंपन्यांचा प्रतिसाद पण…

स्वत: गर्भवती असूनही 9 महिने केली रुग्णांची सेवा, प्रसुतीवेळी कोरोनाने नर्सचा मृत्यू आणि….

“असं ऐकलंय की ट्विटरच्या चिमणीने 56 इंची पोपटाची हवा काढली”

ठाकरे सरकारचा मोठा आणि महत्वाचा निर्णय; ‘या’ दुकानांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश

‘या’ ठिकाणी सांडपाण्यात कोरोनाचा विषाणू मिळाल्यानं भीतीचं वातावरण!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More