हैम्पशायर | यूकेमधल्या हैम्पशायर येथे एक तरुणी सेक्स न करताच गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २८ वर्षाच्या या तरुणीचं नाव निकोल असून ८ वर्षांपूर्वी ती तरुणी गरोदर राहिली होती. ८ वर्षांपूर्वी ह्या तरुणीचा प्रियकर होता, मात्र त्या दोघांच्यात कसल्याचं प्रकारचे शारिरीक संबंध झाले नाहीत, असं तिच्या प्रियकराने देखील स्पष्ट केलं आहे.
८ वर्षांपूर्वी ऑफिसमध्ये असताना एक दिवशी निकोलला अचानक चक्कर येऊ लागली आणि छातीत जळजळ होऊ लागली. यावर तीच्या मैत्रीणीने तीला प्रेग्नंसी टेस्ट करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर निकोलच्या प्रेग्नंसी टेस्ट रिपोर्ट पॅाजिटिव्ह आल्यानंतर तीला व तीच्या प्रियकराला धक्काच बसला. निकोलने दिलेल्या महितीनुसार ती व्हर्जीन आहे. तसेच तीने कधी टेम्पोनचा सुद्धा वापर नाही केला, कारण त्या दरम्यान तीला प्रचंड त्रास होत असल्याचं तीनं सांगितलं आहे.
निकोलच्या अचानक प्रेग्नंसी रिपोर्ट्समुळे तीने आणि तीच्या प्रियकराने डाॅक्टरांना भेट दिली. त्यादरम्यान निकोलला वेजीनीस्मस या नावाचा आजार असल्याचं समोर आलं. या मेडिकल कंडशनमध्ये व्हजाईनाच्या पेशी संकुचित होतात. अचानक पाॅझिटिव्ह आलेल्या प्रेग्नंसी रिपोर्टसमुळे निकोलला तीचा प्रियकर संशय घेऊन तीला सोडून जाईल, अशी भीती वाटू लागली होती. मात्र त्यादरम्यान तीच्या प्रियकराने तीला साथ दिली.
प्रेग्नेंसीच्या चौथ्या महिन्यात निकोलला तीच्या आजारचं समजल्यानंतर तीने तीच्या प्रियकरासोबत जाऊन उपचार करुन घेतला. डाॅक्टरच्या प्रत्येक अपॉईंटमेंटच्या वेळेस निकोलच्या बाॅयफ्रेंडने तीला साथ दिल्याचं तीनं सांगितलं आहे. निकोलला एक मुलगी आहे आणि हे तीच्यासाठी चमत्कारापेक्षा कमी नसल्याचं ती म्हणते. मात्र निकोलचा प्रियकर आता तीच्यासोबत नसल्याचं देखील तीनं स्पष्ट केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
धक्कादायक!; अवघ्या चार ते पाच हजार रुपयात कोरोनाच्या बनावट अहवालाची विक्री
रेल्वे प्लॅटफॉर्मवर पाय ठेवणं आता आणखी महाग; 50 रुपये मोजावे लागणार!
थकबाकीदारांची वीज कापणारच; महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या-रजा रद्द
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर; ‘या’ तारखेपासून होणार पगारवाढ?
ममता बॅनर्जींवरील हल्ल्याला वेगळं वळण; प्रत्यक्षदर्शीनं केला ‘हा’ मोठा खुलासा
Comments are closed.