बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काळजाचा ठोका चुकवणारी घटना; मांत्रिकाकडे जाऊन उपचार घेणं कोरोनाबाधित महिलेच्या जीवावर बेतलं

अमरावती | महाराष्ट्राला पुरोगामी राज्य मानलं जातं. महाराष्ट्रात गेल्या 60 वर्षात अनेकांनी कर्मकांडांविरूद्ध लढा दिला आहे. मात्र आणखी राज्यातील काही भागात कर्मकांडांना थारा दिला जातो. अशीच एक धक्कादायक घटना अमरावतीच्या सेमाडोहमध्ये घडली आहे. एका कोरोनाबाधित महिलेनं चक्क मांत्रिकाकडून उपचार करून घेतले आणि अखेर प्रकरण तिच्या जिवावर बेतलं आहे.

सेमाडोह येथे राहणाऱ्या एका 45 वर्षीय महिलेला कोरोनाची प्राथमिक लक्षण दिसू लागल्यानंतर त्या महिलेनं कोरोना चाचणी केली. त्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर औषधोपचार घेण्याचे सोडून जवळच्या गावातील मांत्रिकाकडे उपचार सुरु केले. महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असताना सुद्धा आरोग्य यंत्रणेपासून हे लपवून ठेवलं. यासाठी तीने सेमाडोह पासून दहा किमी अंतरावरील भवई येथील मांत्रिकाकडे जावून औषधोचार घेण्यास सुरुवात केली.

मेळघाटातील आदिवासी घरातील शुभकार्यापासून ते सर्दी, खोकला, तापासह इतर आजारांवर उपचार घेण्यासाठी मांत्रिकाकडे जातात. दरम्यान या कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाला आहे. गुरुवारी तिची प्रकृती खालावल्यानं तिचा मुत्यू झाला. झालेल्या प्रकारानंतर संपूर्ण मेळघाटात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, करोना पॉझिटिव्ह महिलेवर गुरुवारी रात्री अत्यंसंस्कार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा पीईपी किट व साहित्य घेऊन तयार होती. मात्र, नातेवाईकांच्या विरोधामुळे मृतदेहावर तब्बल 20 तासानंतर अत्यंसंस्कार करण्यात आले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

“मोदींच्या जागी आणखी कोणी असतं तर त्याला हिंदू द्रोही ठरवलं असतं”

‘मी मरेन पण माझ्या कुत्र्याला मरू देणार नाही’; हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल

रेमडेसिवीर मिळत नसेल तर… खासदार अमोल कोल्हेंनी सांगितलं ‘हे’ पर्यायी औषध!

…अन् पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले कुंभमेळ्यातील सर्व संतांचे आभार!

चिंताजनक! 50 टक्के लोकांमध्ये आढळली कोरोनाची ‘ही’ नवी लक्षणं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More