ठाकरे सरकारमधील धनंजय मुंडे, राठोड यांच्यानंतर आता संजय राऊतांवर आरोप
मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चर्चेत असतानाच शिवसेनेच्या आणखी एका प्रतिष्ठीत नेत्यावर एका महिलेने आरोप केल्याची माहिती समोर येत आहे. गेले अनेक दिवस महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर आरोपांचं सत्र सुरू आहे. याआधी राष्ट्रवादीचे नेते आणी मंत्री धनंजय मुंडेंवर, शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड आणि आता शिवसेनेची तोफ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या संजय राऊतांवर थेट आरोप झाले आहेत.
मागील सात वर्षांपासून संजय राऊत आपला छळ करत असल्याची याचिका एका महिलेने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. संजय राऊत यांनी आपल्या मागे पाळत ठेवण्यासाठी माणसं लावली आहेत, हेरगिरी करणं, जीवानिशी मारण्याचा प्रयत्न करणं, शिवीगाळ करणं, धमक्या देणं असे अनेक गंभीर आरोप या महिलेने संजय राऊत यांच्यावर केले आहेत.
2013 पासून संजय राऊत आपला विविध मार्गाने छळ करत आहेत. मध्यंतरी राऊतांनी आपल्यावर प्राणघातक हल्लाही घडवून आणला, त्याविषयी मुंबई पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. मात्र, एफआयआर दाखल केल्यानंतरही राऊतांच्या राजकीय वजनामुळे मुंबई पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचंही या महिलेने सांगितलं आहे.
या महिलेने ॲड. आभा सिंह यांच्या मदतीने न्यायमूर्ती संभाजी शिंदे आणि न्यायमूर्ती मनिष पितळे यांच्या खंडपीठाकडे ही याचिका दाखल केली आहे. याप्रकरणात 4 मार्च रोजी याप्रकरणात पहिली सुनावणी होणार आहे.
थोडक्यात बातम्या-
अबब! चोरी करण्यासाठी चोराची आयडियाची कल्पना, चोरली तब्बल 400 किलो चांदी
मुलांची आता खैर नाही! पालकांना आता कळणार आपली मुले मोबाईलवर नेमकं काय पाहतात?
‘आपण भाजपमध्ये गेला नसता तर…;’अमोल मिटकरींचा चित्रा वाघ यांना टोला
गुडन्यूज! छत्रपती शिवाजी महाराजांवर हिंदीत येतोय नवा सिनेमा, ‘हा’ अभिनेता महाराजांच्या भूमिकेत!
‘सरकारने संजय राठोडांचा राजीनामा घेतला नाही तर…’; चंद्रकांत पाटलांचा सरकारला इशारा
Comments are closed.